पुरोहित मारामारी प्रकरण; "परप्रांतियांमुळे स्थानिक ब्राह्मण समाजाची बदनामी"
पुरोहित मारामारी प्रकरण; "परप्रांतियांमुळे स्थानिक ब्राह्मण समाजाची बदनामी"SaamTvNews

पुरोहित मारामारी प्रकरण; "परप्रांतियांमुळे स्थानिक ब्राह्मण समाजाची बदनामी"

त्र्यंबकेश्वरमध्ये विधी करण्यासाठी यजमान पळवल्याने नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडीमध्ये दोन पुजाऱ्यांमध्येच हाणामारी झाल्याचे समोर आले होते.

पुणे : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये (trimbakeshwar) विविध पूजेवरून पुरोहितांच्या दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ७ तारखेला घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण सात जणांना अटक केली. त्र्यंबकेश्वरमध्ये विधी करण्यासाठी यजमान पळवल्याने नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडीमध्ये दोन पुजाऱ्यांमध्येच हाणामारी झाल्याचे समोर आले होते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावेळी एका पुजाऱ्याने स्वतः कडील गावठी कट्टाच दुसऱ्या पुजाऱ्यावर रोखला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सात संशयितांना पंचवटी पोलिसांनी (Police) अटक देखील केली.

मारामारी सुरु असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून हस्तक्षेप करत ही हाणामारी रोखली होती. दरम्यान, पुजाऱ्यांच्या मोटारीची पोलिसांनी झडती घेतली असता कारमधून एक गावठी कट्टा व अकरा जीवंत काडतुसे पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

याच प्रकरणावर आता त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ आणि ब्राह्मण संघाचे आनंद दवे (Anand Dave) यांनी प्रतिक्रिया व्यक्त मारामारी करणारे पुरोहित हे परप्रांतीय असून त्यांच्यामुळे स्थानिक पुरोहित वर्गाची बदनामी होत असल्याचे म्हटले आहे.

पुरोहित वर्गासाठी अधिकृत डिग्री, अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत असावी : त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेला प्रकार दुर्दैवी असून मारामारी करणारे पुरोहित व ज्यांच्या जवळ हत्यारे सापडली ते सर्वजण परप्रांतीय आहेत. त्यांच्यामुळे स्थानिक ब्राह्मण समाजाची बदनामी होत आहे. शेकडो वर्षांपासून मंदिराचा कारभार संभाळणाऱ्या स्थानिक पुरोहित समाजाला विधीच्या परंपरा व पद्धती चांगल्या प्रकारे माहित असल्याने विधीचे सर्व अधिकार त्यांच्याकडेच असावेत. शुल्क किती असावे यावरून सुरु झालेले हे वाद अगदीच टोकाला गेले आहेत आणि त्यामुळे पुरोहित वर्गाविषयी नागरिकांत गैरसमज निर्माण होत आहेत. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या तेथील स्थानिक पुरोहित वर्गाचा या मारहाणीत काहीही संबंध नाही. मारामारी करणाऱ्या या परप्रांतीय लोकांना परंपरा, पद्धत याविषयी सुद्धा पूर्ण ज्ञान नसते, केवळ कमी खर्चात विधी उरकले जातात आणि यासाठीच शासनाने अधिकृत अभ्यासक्रम, पूजा, विधी पद्धत अंगीकरून त्याला मान्यता द्यावी.

आनंद दवे (ब्राह्मण महासंघ)

हाणामारी करणाऱ्या परप्रांतीय पुरोहितांसोबत त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचा काहीही संबंध नाही. परप्रांतीय पुरोहित पूजेसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारून भाविकांची आर्थिक लूट करतात. परप्रांतीय पुरोहितांवर कारवाई करावी.

प्रशांत गायधनी (अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ)

Edited By : Krushnarav Sathe

पुरोहित मारामारी प्रकरण; "परप्रांतियांमुळे स्थानिक ब्राह्मण समाजाची बदनामी"
बैलगाड्या रस्त्यावर सोडून, शेतकऱ्यांचा सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात चक्काजाम!
पुरोहित मारामारी प्रकरण; "परप्रांतियांमुळे स्थानिक ब्राह्मण समाजाची बदनामी"
मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधीतील 130 कोटी पैकी 31 कोटी खर्च, 99 कोटी शिल्लक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com