Solapur Exam Paper Stolen Case Saam tv
महाराष्ट्र

SSC Exam: शिक्षण क्षेत्रात खळबळ, परीक्षेच्या आदल्या दिवशी भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला

Solapur Exam Paper Stolen Case: सोलापूरमध्ये दहावीचा पेपर चोरीला गेला. भूगोलाच्या पेपरच्या आदल्या दिवशी शाळेतून ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्या. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • सोलापूरच्या सांगोल्यात दहावीच्या पेपरची चोरी

  • भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका शाळेतून गायब

  • CCTV बंद असल्याचा पोलिसांचा धक्कादायक खुलासा

  • बोर्ड आणि पोलिसांकडून तपास सुरू

अक्षय बडवे/ भरत नागणे, साम टीव्ही

परीक्षेआधीच दहावीचा भूगोल पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यामध्ये दहावीच्या भूगोल पेपरची चोरी झाली. या पेपर चोरी प्रकरणाची बोर्डाने दखल घेतली. या प्रकरणाच्या तपासासाठी बोर्डाचे अधिकारी सांगोल्याला तात्काळ रवाना झाले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे उपसंचालक स्वतः सांगोल्यातील ज्या शाळेतून भूगोलाच्या पेपरची चोरी झाली होती त्या ठिकाणाला भेट देणार आहेत.

सोलापुरातील सांगोल्यामध्ये असलेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेतून भूगोलाच्या तब्बल ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या पेपर फुटी प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत चौकशी सुरू केली आहे. या तपासातून शाळेमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सांगोला विद्या मंदिर विद्यालयाच्या कस्टी रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी दहावीच्या भूगोल विषयाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरून नेल्याची घटना घडली होती. दरम्यान कस्टी रूमच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची बाब आता पोलिस तपासातून समोर आली आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.‌ प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सोलापूर जिल्हा पोलिस उपाधीक्षक प्रीतम कुमार यावलकर यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली आहे. दरम्यान पुणे बोर्डाचे अधिकारी देखील या शाळेला भेट देणार आहेत. भूगोलाची प्रश्नपत्रिका चोरी झाल्यानंतर उद्याच्या भूगोल पेपर विषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पेपर पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सांगोला विद्यामंदिर येथील दहावीच्या भूगोल विषयाच्या ५० प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरीला गेल्या प्रकरणी बंदोबस्तासाठी असलेले पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड दोषी असतील तर त्याच्याविरोधात कारवाई होईल. सोलापूर ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर यांनी ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, बीडमधील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: जिरेवाडी ग्रामसेवक लाच घेताना रंगेहात अटक; ACBची कारवाई

Hair Care: कमरेपर्यंत लांब, दाट केस हवेत? मग शॅम्पूमध्ये मिक्स करा हे दोन घरातील पदार्थ, केस गळणं होईल कमी

Eye health tips: डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करूच नका; वेळेत उपचार केल्यास अंधत्वाचा धोका होईल कमी

Watermelon Eating Time: उन्हाळ्यात कलिंगड खाण्याची योग्य वेळ काय? कोणत्या वेळी खाल्ल्याने शरीराला फायदा होतो?

SCROLL FOR NEXT