Navneet Rana-Eknath SHinde Saam TV
महाराष्ट्र

Navneet Rana: धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळणार, नवनीत राणांचा मोठा दावा

बाळासाहेबांची विचारधारा ज्यांच्यासोबत आहेत म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळेल.

साम टिव्ही ब्युरो

>> अमर घटारे

Navneet Rana : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं हा वाद सध्या दोन्ही गटांमध्ये सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेणार आहे. मात्र त्याआधीच धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळणार असा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

माझा देवावर, हनुमान चालीसावर विश्वास आहे. बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदेसोबत आहे. त्यामुळे बाळासाहेबांची विचारधारा ज्यांच्यासोबत आहेत म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह मिळेल. पुढच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हे धनुष्यबाण घेऊन मैदानात उतरतील, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं.

धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. तर पक्षघटनेत बदल केल्याने शिंदे गटाने हरकत घेतली. येत्या 17 जानेवारीला निवडणूक आयोगात शिवसेना कोणाची याचा निर्णय होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार दुष्काळी अरण गावाला आज भेट देणार

Maharashtra Politics : सरकार लवकरच कोसळणार, कुणी केला दावा? कारणही सांगितले; पाहा व्हिडीओ

तेव्हा तुम्ही पाकिस्तानला लव्ह लेटर लिहायचे; एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर घणाघात|VIDEO

२ आमदारांनी कमळ घेतलं हातात, पण अचानक घेतला यू-टर्न; म्हणाले भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही, २४ तासांत नेमकं काय झालं?

Crime: मित्रांकडून डान्सर तरुणीवर सामूहिक बलात्कार, वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं नंतर...

SCROLL FOR NEXT