Shivsena News : शिवसेना कोणाची? ‘धनुष्यबाण’ कोणाला मिळणार? राज्यातील सत्तासंघर्षावर उद्यापासून महत्त्वाची सुनावणी

उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगात युक्तीवाद होणार आहे.
Uddhav Thackeray And Eknath Shinde
Uddhav Thackeray And Eknath Shinde saam tv
Published On

Shivsena News : राज्यातील राजकारणासाठी महत्वाची असणारी सुनवणी उद्यापासून सुरु होत आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता पक्ष आणि पक्षचिन्ह नेमकं कुणाचं असा पेच निर्माण झाला होता. याप्रकरणी उद्या म्हणजे 12 डिसेंबरपासून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होणार आहे. (Shivsena)

शिवसेना कोणाची? शिवसेनेचं निवडणूक चिन्हं ‘धनुष्यबाण’ कोणाला मिळणार? याबाबतच्या निर्णयासाठी उद्यापासून महत्वाची सुनावणी सुर होत आहे. उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगात युक्तीवाद होणार आहे. (Latest Marathi News )

Uddhav Thackeray And Eknath Shinde
Supriya Sule : 'कायदा आता गृहमंत्री फडणवीसांच्या म्हणण्यानुसार चालतो'; शाईफेक प्रकरणावरून सुप्रिया सुळे असे का म्हणाल्या?

केंद्रीय निवडणूक आयोगात उद्या शिंदे गट आणि ठाकरे गट युक्तीवाद करणार आहे. धनुष्यबाणावर दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर आता प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू होणार आहे.

गेले दोन महिने दोन्ही बाजूंनी लाखो कागदपत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहेत. या कागदपत्रांची पडताळणी करुन चिन्ह गोठवल्यानंतर आता आयोगाचा अंतिम निर्णय काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray And Eknath Shinde
Akola : 'छत्रपती शिवाजी महाराज कुणबी होते, कुणबी समाजाने देशाला नेतृत्व दिले'; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्यासाठी 9 नोव्हेंबरची मुदत दिली होती. दोन्ही गटांना आपापले कागदपत्र निवडणूक आयोगसमोर सादर केली आहेत.

या प्रकरणाची ठाकरे गटाची याचिका 15 नोव्हेंबरला दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली होती. तसेच या वादावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com