Sanjay Raut News  Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News : 'राणे तुम्ही गुंड, तर मी महागुंडच'; संजय राऊत यांचा नारायण राणे यांना सज्जड दम

संजय राऊत यांनी नारायण राणे यांना सज्जड दम दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

Sanjay Raut News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'राणे तुम्ही गुंड,तर मी महागुंड, मी कुणालाही घाबरणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. 'आज सकाळी मी नारायण राणेंना उत्तर दिल्या पासून त्यांनी माझी ओळख देण बंद केले. हे त्यांच्या प्रकृत्तीसाठी चांगलं. त्यांनी माझी ओळख काढण्याचा प्रयत्न केला, तर माझं नाव संजय राऊत आहे, असा सज्जड दम संजय राऊत यांनी नारायण राणे यांना सज्जड दम दिला.

'राणे तुम्ही गुंड, तर मी महागुंड, कुठे येवू, मी कुणालाही घाबरणार नाही. कुठल्याही एजंन्सीला घाबरत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यावेळी शिंदे गटावरही जोरदार बरसले. 'शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय आहे. कचऱ्यासमोर मुख्यमंत्री शिंदे भाषण करतात. शिंदे गटात गेलेले सगळे चोर लफंगे आणि कचरा आहे. त्याला आग लागते आणि धूर निघतो'.

'समृद्धीच्या टक्केवारीतून पक्ष बनत नाही. पक्ष हा रक्त घामातून बनतो. मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे अनेक विषय आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाच लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रातून नेतात. आमचं बिऱ्हाड जर्मनीला गुंतवणूक आणण्यासाठी जातात, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर केली.

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर यांची वाचा गेलेली आहे. भाजपाला छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल कधीच प्रेम नव्हते. त्यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांचे तुलना करणारे बॅनर लागले होते, अशीही टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा अधिकार

Shocking : धक्कादायक! दुचाकीवरून जाताना गळा कापला अन् खाली कोसळले , चिनी मांजाने घेतला ऑर्थोपेडिक सर्जनचा जीव

धक्कादायक! पुण्यात मतदानानंतर शाई पुसण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने दिला 'प्रसाद' |VIDEO

RBI Jobs: १०वी पास तरुणांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ५७२ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Shashank Ketkar : "ज्या शाळेत मतदान केले त्या शाळेच्या बाहेर 'ही' अवस्था..."; शशांक केतकर चिडला, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT