Sanjay Raut On Municipal Corporation Election Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मुंबईत स्वबळावर, पण.., महापालिका निवडणुकांबाबत संजय राऊतांचे विधान चर्चेत

Sanjay Raut On Municipal Corporation Election : 'मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढू' असा नारा ठाकरे गटाने दिला आहे. तेव्हा ठाकरे गट मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकाही स्वतंत्र लढणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

Yash Shirke

Sanjay Raut Statement : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांची तयारी सुरु झाली आहे. मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिला आहे. तेव्हा मुंबईपुरतं स्वबळावर लढण्याची नीती ठाकरे गटाने स्विकारली आहे असे म्हटले जात होते. पण त्यावर पक्षाने स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. आता या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे.

संजय राऊत म्हणाले, 'स्वबळाचा नारा दिला याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली किंवा संपली असा काढता येत नाही. हा विषय फक्त मुंबईपुरता मर्यादित आहे. मुंबईवर अनेक वर्ष शिवसेनेचा पगडा आहे. शिवसेनेने मुंबईत सातत्याने आपली पकड ठेवली आहे. ही पकड अशीच ठेवायची असेल तर स्वबळावर लढले पाहिजे असे कार्यकर्त्यांचे मत आहे. ही परिस्थिती इतर शहरात असेल का याबद्दल साशंकता आहे. पण तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे म्हणणं आहे की एकत्र लढणं गरजेचे आहे.'

'आम्ही मुंबई महानगरपालिका ताकदीने लढवू. मुंबईची परिस्थिती, रचना आणि विषय वेगळे आहेत. महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली होती. तर इंडिया आघाडी लोकसभेसाठी तयार झाली होती. तेव्हा महानगरपालिका निवडणुकांमध्ये काय करायचे हे तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते बसून ठरवतील' असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

ते पुढे म्हणाले, 'विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. लोकसभेत आमचा विजय झाला. विधानसभेत पराजय झाला. त्या पराभवाने खचून न जाता आगामी निवडणुका लढण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. आज पुणे, पिंपरी चिंचवड भागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT