Ajit pawar vs Eknath Shinde Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीकडून लपंडाव अन् पाठीत वार, गद्दारी कराल तर..' CM शिंदेंच्या आमदाराचा सुनील तटकरेंना इशारा; महायुतीत ठिणगी!

Maharashtra Politics Shivsena Shinde Group Vs NCP Ajit Pawar Group News: "लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीने आमच्या उमेदवाराचे काम केले नाही जाहीरपणे त्यावेळीच आमच्या खासदारांनी सांगितले आहे,," असं थोरवे म्हणाले.

Gangappa Pujari

सचिन कदम, रायगड|ता. २८ जुलै २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच महायुतीमधील वाद टोकाला गेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीचा धर्म पाळला गेला नाही असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीला खडेबोल सुनावले आहेत.

शिंदे गट अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ठिणगी!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोदरार हल्लाबोल केला.

काय म्हणाले महेंद्र थोरवे?

रायगड मतदार संघामध्ये सगळ्या आमदारांनी एकत्रित काम केले म्हणून विजय संपादन करण्यात आला. मात्र राष्ट्रवादीकडून युतीधर्म पाळण्यात आला नाही. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीने आमच्या उमेदवाराचे काम केले नाही जाहीरपणे त्यावेळीच आमच्या खासदारांनी सांगितले आहे, असं थोरवे म्हणाले.

तसेच "कर्जतमध्ये विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार घोषित झाला आहे. महायुती असतानाही लपंडाव, पाठीत वार करण्याचे काम सुरू झाले आहे. महाड मतदार संघ आम्ही कसाही खेचून आणूच, पण गद्दारी कराल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा करू, राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नाही, त्यांची कुटनीती आम्ही ओळखून आहोत," असे म्हणत महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीला थेट इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT