mla kailash patil and nitin deshmukh felicitated  saam tv
महाराष्ट्र

...थोडा वेळ धीर धरावा लागेल, शिवसेनेच्या 'या' महिला खासदाराचं ट्विट चर्चेत

एकनाथ शिंदे यांच्या गोटातून स्वगृही परतलेल्या दोन बंडखोर आमदारांचा शिवसेनेकडून सत्कार करण्यात आलाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे हादरे दिले आहेत. राज्याच्या राजकारणाला कलाटणी लावणारे चित्र बंडखोर शिंदे समर्थकांनी केल्यामुळे शिवसेनेची उलटगणती सुरु झाली आहे. समोरा- समोर येवून चर्चा करा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून केलं होतं.

त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री ठाकरे यांना वर्षा बंगल्याला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडण्यातबाबत सूचक ट्विट केलं. त्यामुळे एकनाथ शिंदे समर्थक अजूनही त्यांच्या मागण्यांवर ठाम असल्याचं चित्र आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या गोटातून स्वगृही परतलेल्या दोन बंडखोर आमदारांचा शिवसेनेकडून सत्कार करण्यात आलाय. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, मंत्री सुभाष देसाई यांच्यासब शिवसेनेचे नेते उपस्थित होते. याबाबत शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी ट्विटरच्या माध्यामातून प्रतिक्रिया दिली आहे.

उस्मानाबादचे आमदार कैलाश पाटील (Kailash Patil) आणि अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हे दोघेही गुवाहाटीवरुन शिवसेनेत स्वगृही परतले आहेत. त्यांचं स्वागत शिवसनेच्या शिष्टमंडळाने केलं आहे. अजून खूप आमदार येतील. थोडा वेळ धीर धरावा लागेल, असं प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४२ आमदारांनी बंड केल्याचा दावा करण्यात आलाय.या संबंधित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नवीन दावा केला आहे. एकनाथ शिंदें यांच्या ताब्यात असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झालेला आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

भाजपने शिवसेनेच्या आमदारांना फसवून गुजरातला नेले.कोणी सध्या कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले असले तरी त्यातील २१ आमदारांचा संपर्क झाला आहे. ते आमदार ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील,असंही संजय राऊत म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी

Influencer Accident:'बिग बॉस' फेम इन्फ्लुएंसरचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारचा अक्षरश: चुराडा

महिलांना स्वत:ची लघवी पाजायचा अन् काचेच्या कॅबिनमध्ये सर्वांसमोरच...; कॅप्टन खरातचा आणखी एक कारनामा उघड

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार? बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Pitla Bhakri Recipe: जेवण करायचा कंटाळा आलायं? मग घरी झटपट कमी गॅसमध्ये बनवा झणझणीत पिठलं भाकरी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT