'नाव राष्ट्रवादी, काम मात्र कुटुंबवादी' शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल SaamTV
महाराष्ट्र

'नाव राष्ट्रवादी, काम मात्र कुटुंबवादी' शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल

'मार्गदर्शन करण्यासाठी समोरच्याकडे जाण, जाणीव, नीतिमत्ता लागते मात्र तटकरेंकडे यातील काहीच नाही. त्यांना फक्त घ्यायचं माहित, द्यायचं माहीत नाही.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे आणि आमदार भास्कर जाधव (NCP MP Sunil Tatkare and MLA Bhaskar Jadhav) यांच्यामध्ये सध्या वाद रंगल्याच पहायला मिळत आहे. राज्यात सत्तेत एकत्र असले तरी आघाडीच्या नेत्यांमध्ये काहीतरी वाद सतत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा जाधव विरुद्ध तटकरे सामना रंगला असून या वादाच कारण आहे ते म्हणजे विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला सोडावी ही मागणी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केल्यामुळे हा वाद सुरु झाला आहे.

हे देखील पहा -

कुणबी समाजाला जागा सोडा म्हटल्यावरती तटकरेंना मिरच्या का झोंबल्या? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थि तर केलाच शिवाय यांच फक्त नाव राष्ट्रवादी, आहे मात्रकाम कुटुंबवादी, असल्याचा हल्लाबोल जाधव यांनी तटकरेंवरती केलाय. तसेच सुनील तटकरेंवरती (Sunil Tatkare) खोट्या कंपन्या स्थापन केल्याच्या नावाखाली लोकांच्या हजारो एकर जमीनी लाटल्याचे आरोप असून 10 -15 हजार कोटींची बेहिशेबी मालमत्ता त्यांनी जमवली असल्याचे आरोप तटकरेंवरती आहेत. त्यामुळे अशा माणसाला मार्गदर्शन करण्याची माझी कुवत नाही, असा टोला देखील भास्कर जाधवांनी तटकरेंना लगावला आहे.

मार्गदर्शन करण्यासाठी समोरच्याकडे जाण, जाणीव, नीतिमत्ता लागते मात्र तटकरेंकडे यातील काहीच नाही. त्यांना फक्त घ्यायचं माहित, द्यायचं माहीत नाही, अशा शब्दात तटकरेंवरती भास्कर जाधवांनी टीका केली आहे. तसंच तटकरेंना खासदार करण्यामध्ये माझं योगदान आहे. मात्र माझ्या कोणत्याही विजयामध्ये तटकरेंच योगदान नाही. उलट मला पाडण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांनी काड्या केल्या असून त्यांना मदत करणाऱ्यांचे ते कायम वाटोळं करतात असा आरोप भास्कर जाधव यांनी तटकरेंवरती केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: पुढच्या वर्षी राहू करणार शनीच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

SCROLL FOR NEXT