minister uday samant gives warning to party mlas Saam Tv News
महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी तक्ता तयार केलाय; उदय सामंत यांनी आमदारांचे कान टोचले, शिवसेनेतील मोठी बातमी

Uday Samant Sindhudurg Speech : 'सोमवारपासून रविवारपर्यंत आपण जर का मुंबईत ठाण मांडत बसत असू तर आपण सिंधुदुर्गमधील संघटना कधी बांधणार आहोत? याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे', अशा शब्दात सामंत यांनी यावेळी सुनावलं.

Prashant Patil

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्याच पक्षाच्या आमदारांचे भर कार्यक्रमात कान टोचले आहेत. 'एकनाथ शिंदे यांनी एक तक्ता तयार केला आहे. त्यांनी आमदार किती दिवस मुंबईत असतात आणि किती दिवस आपल्या मतदारसंघात असतात ते पाहण्याचं आता ठरवलं आहे. त्यांची टक्केवारी ठरवत आहेत की किती दिवस मतदारसंघात आणि किती दिवस मुंबईत असतात. पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की, ही वेळ आपल्यावरही येणार आहे. काही लोक सिंधुदुर्गचं हेडक्वार्टर मुंबई आहे, अशा पद्धतीनं कामासाठी येतात', अशा शब्दांत उदय सामंत यांनी आमदारांचे कान टोचले आहेत.

'शिवसेना पक्ष हा सामान्य माणसापर्यंत तळागाळापर्यंत कसं पोहोचतो याकडे प्रामाणिकपणे लक्ष दिलं पाहिजे. विकासाची कामे असतील, जिल्ह्याच्या समिती असतील, विशेष कार्यकारी अधिकारी पद असतील, ही सगळी नावं आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक ही नेते मंडळी एकत्रितपणे बसून चर्चा करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवतील. त्यामध्ये कोणी डावे-उजवे होणार नाही', असं मंत्री उदय सामंत म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित संवाद बैठकीत उदय सामंत बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, दत्ता सामंत, संजय आग्रे, राजा गावडे, रुपेश पावसकर, आनंद शिरवलकर, संजय पडते, अशोक दळवी, वर्षा कुडाळकर, सचिन वालावलकर, वैशाली पावसकर, गणेश गवस आदी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

'सोमवारपासून रविवारपर्यंत आपण जर का मुंबईत ठान मांडत बसत असू तर आपण सिंधुदुर्गमधील संघटना कधी बांधणार आहोत? याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे', अशा शब्दात सामंत यांनी यावेळी सुनावलं. 'मंगळवार, बुधवार मुंबई जायला कोणाचा आक्षेप नाही. कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी मंत्री भेटू शकतात', असंही सामंत यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT