सचिन बनसोडे
शिर्डी : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या चाळीस आमदारांसह बंडाचा झेंडा फडकवल्याने ठाकरे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर राजकीय घमासान सुरु झालं. 'शिवसेना आमचीच' असा दावा ठाकरे आणि शिंदे गटाकडून केला जात असतानाच शिंदे गटात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचा सपाटा सुरूच आहे.
अशातच आता पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. शिर्डीत शिवसेनेला खिंडार पडली असून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता जगताप यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जगताप यांच्यासह 150 शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Shivsena leader anita jagtap including 150 leaders entered in eknath shinde group)
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उत्तर नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच ठाकरे गटाला धक्का बसला आहे. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरही शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक ठाकरेंसोबतच होते.
मात्र, आता महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता जगताप आणि त्यांचे पती माजी नगरसेवक विजय जगताप यांच्यासह १५० कार्यकर्त्यांनी ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिर्डीच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांना दिलं असल्याचं जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.