शिंदे गटाची युवासेनेची कार्यकारिणी जाहीर, प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईकला डावललं

शिंदे गटाची राज्य युवासेनेची कार्यकारिणी जाहीर, पण....
Purvesh Sarnaik
Purvesh Sarnaiksaam tv
Published On

संजय गडदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तेच्या चाव्या हाती घेतल्यानंतर विरोधक आणि शिंदे गटात शीतयुद्ध सुरु आहे. दिवसेंदिवस शिंदे गटाकडून नवे राजकीय डावपेच आखले जात आहेत. विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) राज्यात आपल्या पक्षाचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना शिंदे गटात सामील करून त्यांना लगेच नियुक्तीपत्र देखील दिली जात आहेत.शिंदे गटाने आज युवासेनेची राज्य कार्यकारिणी जाहीर केली. (eknath shinde group yuvasena maharashtra committee announced)

Purvesh Sarnaik
Video : PM मोदींचा ताफा थांबून अॅम्बूलन्सला वाट करून दिली; कौतुक तर होणारच

या राज्य कार्यकारिणीत शिंदे गटातील अनेक नेत्यांच्या मुलांना,नातेवाईकांना स्थान देण्यात आलं.मात्र ,ओवळा माजीवाडा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांना मात्र या कार्यकारिणीत स्थान दिलं नाही. त्यामुळे शिंदे आणि सरनाईक यांच्यातील नाराजी स्पष्टपणे उघड झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

आज शिंदे गटाच्या मुख्य नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिंदे गटाच्या युवासेनेची राज्य कार्यकारिणी देखील घोषित करण्यात आली. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे,मराठवाडा भागाची जबाबदारी अर्जुन खोतकर यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर व अविनाश खापे पाटील, कोकण रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्गची जबाबदारी आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे यांना देण्यात आलीय.

Purvesh Sarnaik
Weather Update: राज्यात पुढील 4-5 दिवस विजांच्या कडकडटासह पावसाचा अंदाज, पुण्याला आज झोडपलं

तर पश्चिम महाराष्ट्रची जबाबदारी मंत्री उदय सामंत व शिवाजीराव आढळराव यांनी यांचे निकटवर्तीय किरण साली, सचिन बांगर,कल्याण भिवंडीसाठी दीपेश म्हात्रे,प्रभुदास नाईक, मुंबईची जबाबदारी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे आणि राज कुलकर्णी, आमदार दिलीप लांडे यांचे पुत्र प्रयाग लांडे आणि ठाणे, नवी मुंबई व पालघर भागातून नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या सोबत काम करणाऱ्या पूर्वेश सरनाईक यांना मात्र शिंदे गटाच्या युवासेना कार्यकारणीतून डावलण्यात आले आहे. यामुळे आता सर्वेश सरनाईक नाराज असल्याचे देखील बोलले जात आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेत पूर्वेश सरनाईक हे सचिव म्हणून कार्यरत होते.तर त्यांचा एक भाऊ नगरसेवक म्हणून देखील काम पाहत होता. मात्र आता शिंदे आणि सरनाईक या दोघांमध्ये खटके उडाल्यामुळे युवासेना कार्यकारिणीतून सरनाईक यांच्या पुत्रांना डावलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात वाद झाल्याची चर्चा होती आणि आज शिंदे गटाने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करताना मात्र सरनाईक पुत्र पूर्वेश यांना डावलले आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com