
नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप झाल्याचा खळबळजनक दावा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.
या प्रकरणात सांगलीतील दोन माजी मंत्री सहभागी असल्याचे खडसे म्हणाले.
पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणात खडसेंचे जावई प्राजंल खेवलकर हे आरोपी क्रमांक एक; कारवाईवर सूडबुद्धीचा आरोप.
खेवलकर यांना जाणीवपूर्वक अडकवलं गेल्याचा खडसे यांचा दावा; ड्रग्जचा संबंध फेटाळला.
Nashik Sangli Honey Trap News : नाशिकनंतर सांगलीमध्येही हनी ट्रॅप झाल्याचा दावा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. सांगलीमधील दोन माजी मंत्री यामध्ये आहेत, ते आपण शोधून काढू असे एकनाथ खडसे यांनी दावा केला आहे. नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात खडसे यांनी महाजन यांचे नाव घेतले होते. गिरीश महाजन हनी ट्रॅप बद्दल का बोलत नाहीत. मी स्वतः सी डी बघितली आहे, पण आज मी त्यावर बोलणार नाही, असेही खडसे म्हणाले. त्याशिवाय नाशिक प्रकरणाचाही सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी खडसेंनी केली.
पुण्यातील खराडी येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरण चांगलेच तापलेय. खडसेंच्या जावई प्रांजल खेवलकर यांना क्रमांक एकचे आरोपी केल्याने ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. यावेळी त्यांनी सांगलीमध्येही हनी ट्रॅप झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
प्राजंल खेवलकर यांना अडकवल्याचा आरोप खडसेंनी केला. त्याशिवाय पोलिसांच्या कारवाई आणि तपासावर खडसेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खेवलकर यांनी आयुष्यात कधीच ड्रग्ज घेतले नाहीत. त्यांना अडकवण्यात आले. पोलीस साध्या वेळात खेवलकर यांचा पाठलाग, पाळत ठेवली जात होती. खडसे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी हे केले जातेय. आम्ही नाशिक हनी ट्रॅ्प प्रकरणावर शांत बसणार नाही. आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही, असेही खडसे म्हणाले.
जावयाचा मोबाईल जप्त केला, लॅपटॉप घेऊन गेले. मोबाईलमधील फॅमिली फोटो बाहेर कसं येतात? पोलिसांनी आमचा कुटुंब. यांचे फोटो का बाहेर काढले? कोणीतरी सूत्रधार आहे, पोलिस बाहुली म्हणून काम करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी मी करतोय. अनेक प्रकरण मी सरकारची बाहेर काढतोय म्हणून हे सगळं षडयंत्र आहे. सत्य समोर येईल आमचा लढा चालू राहील, असेही खडसे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.