Minister’s Daughter Allegedly Added to Voter Roll Claims Danve Saam
महाराष्ट्र

मंत्र्यांकडूनच मतदार यादीत घोळ; अंबादास दानवेंचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Minister’s Daughter Allegedly Added to Voter Roll Claims Danve: अंबादास दानवे यांचा संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यावर गैरप्रकाराचा आरोप. मुदत संपल्यानंतर मतदार यादीत नाव नोंदवलं असल्याचं म्हणणं.

Bhagyashree Kamble

  • संजय शिरसाटांवर अंबादास दानवेंनी सोडले टीकेचे बाण

  • मुदत संपल्यानंतरही लेकीचं नाव यादीत टाकलं

  • राजकीय दबाव टाकून नाव यादीत टाकल्याचा दानवेंचा आरोप

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आज पुन्हा एक नवा आरोप करण्यात आला आहे. हा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय. पालकमंत्री शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट यांचे नाव मुदत संपल्यानंतर मतदार यादीत टाकले असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितले. त्यामुळं पुन्हा निवडणुकीच्या हंगामात आरोपाची राळ उठायला सुरुवात झालीय.

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा संजय शिरसाठ यांनी २६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांच्या मूळ मतदार यादीतून नाव काढून, दुसऱ्या ठिकाणी नाव नोंदवले असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. १ जुलै २०२५ ही मतदान नोंदणी करण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान, हर्षदा संजय शिरसाठ यांच्याकडून २६ ऑक्टोबर २०२५ रोजी मतदार यादीत राजकीय दबाव टाकून नाव टाकल्याचा आरोप आहे.

महेंद्र खोतकर या वाळूज पंढरपूर येथील एका ग्रामपंचायत सदस्याने यासंदर्भात माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे तक्रार दिली. या तक्रारीनंतर अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी असे होणार नाही तरीदेखील चौकशी करून कळवतो असे दानवे यांना सांगितले.

हर्षदा संजय शिरसाट यांचे मतदान हे महानगरपालिका हद्दीमध्ये होते. मात्र, ते आता बदलून गोलवाडी म्हणजेच ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असल्याचं सांगितलं जातंय. त्या संदर्भातच ही तक्रार करण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतर मतदार यादीत नाव कसे येऊ शकते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

दुसरीकडे मतदार नोंदणीची प्रक्रिया ही निरंतर असते. कोणत्याही व्यक्तीला मतदार यादीमध्ये स्वतःचे नाव नोंदवण्यासाठी कोणतीही वेळ मर्यादा नाही. एखाद्या मतदाराला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर नोंदवायचा असेल तर तीही प्रक्रिया करता येते. यात काही गैर नाही. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान करता येणार नाही. कारण एक जुलै 2025 रोजी निवडणूक आयोगानेच मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फ्रीज केली आहे. त्यानंतर ज्या मतदाराने आपले नाव नोंदवले आहे त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही, असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र, राजकीय आरोपाच्या फेरीत कॅमेऱ्यावर बोलण्यासाठी अधिकाऱ्यांनी नकार दिला.

त्यामुळे हा आरोप केवळ आरोपापुरता राहतो की पालकमंत्र्यांची मुलगी १ जुलै २०२५ च्या फ्रीज केलेल्या यादीमध्ये मतदार म्हणून येते याचं उत्तर मतदानारोजी कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात भाजपला धक्का,नेत्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

Kalyan News: धक्कादायक! १९ व्या मजल्यावरून उडी घेत १४ वर्षीय मुलीची आत्महत्या, हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्हीत कैद

Palghar Tourism : वीकेंडला करा जोडीदारासोबत ट्रेकिंगचा प्लान, पालघरमध्ये आहे सुंदर डेस्टिनेशन

महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत क्षुल्लक कारणावरुन वाद

SCROLL FOR NEXT