sambhaji bhide visits jat near sangli and took darshan of Chhatrapati Shivaji Maharaj idol saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Shivaji Maharaj: जतला तणावपुर्ण स्थिती; संभाजी भिडेंनी शिवरायांच्या पुतळ्याचे घेतले दर्शन

सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित विभागाची परवानगी घेतल्याशिवाय पुतळा बसवता येणार नाही असा आदेश दिला आहे.

विजय पाटील

सांगली : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सध्या तणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाने जत येथे जमावबंदी आदेश लागू केला. येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मंगळवारी पोलिसांनी शहरात संचलन केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (sambhaji bhide) यांनी जत (jat taluka) येथे जाऊन शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

सांगलीच्या (sangli) जत शहरातील छत्रपती शिवाजी चौकात चबुतरा बसवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (shivaji maharaj) पुतळा बसण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. लोकवर्गणीतून १६ लाखाहून अधिक रुपये खर्चून तयार केलेला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा बसविण्यासाठी आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय हा पुतळा चबुतरावर उभा करता येणार नाही असा निर्णय दिला आहे.

छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आहे. या बराेबरच शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT