ओंकार कदम / रणजीत माजगावकर
जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) की जय असा जयघाेष करीत आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास एकेक शिवप्रेमी किल्ले प्रतापगडावर (pratapgad fort) कूच करीत हाेता. निमित्त हाेते प्रतापगडावर साज-या हाेणा-या शिवप्रताप दिन (shivpratap din) याचा. किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन माेठ्या उत्साहात साजरा झाला. (Maharashtra News)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक घटनांच्या साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगड आज शिवमय झाला हाेता. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाशी (afzal khan) दोन हात करत याच गडावर खानास संपवून प्रताप गाजवला होता. यामुळे या दिवसाला खूप माेठं महत्व आहे. आज शिवप्रताप दिन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने साजरा करण्यात आला.
सकाळी किल्ले प्रतापगडवरील भवानी मातेची पूजा झाल्यानंतर शिवप्रताप दिन सोहळ्यास प्रारंभ झाला. यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी भगव्या ध्वजाचे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
छत्रपतींची शिवमुर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी (ias jitendra dudi), पोलीस अधीक्षक समीर शेख (samir shaikh) यांच्यासह प्रांत, तहसीलदार आणि उपस्थित मान्यवर या मिरवणूकित सहभागी झाले होते.
प्रतापगडावर शिवरायांचा जयजयकार
या मिरवणुकीत पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळेच्या मुलामुलींचे लेझीम- तुताऱ्या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.
पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी दुडी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्वृष्टी करण्यात आली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे साता-यात शिवप्रताप दिन साजरा
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान राजधानी सातारा तर्फे आज शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला. नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी प्रफुल्लकुमार वनखंङे यांच्या हस्ते शिवमुर्तीचे पुजन करण्यात आले.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख सतीश बापु ओतारी, बजरंग दलाचे विजय गाढवे, राजु गोरे व मोठ्या प्रमाणावर धारकरी व शिवभक्त ऊपस्थित होते. प्रेरणामंत्र झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
शिवप्रताप दिन कोल्हापुरात साजरा
शिवप्रताप दिना निमित्त हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहशतवाद असाच संपवावा लागतो अश्या आशयाचा अफजलखानाचा वधाचा पोस्टर झळकवला आहे.
यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून जय श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत सध्या देश स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे असे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.