Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale  saam tv
महाराष्ट्र

Satara News: झुकेगा नहीं साला ! डायलॉगबाजीने तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या उदयनराजेंच्या भूमिकेकडे लागलं लक्ष

ओंकार कदम

Satara : सातारा शहरात पोवई नाक्यावर एक वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या घराशेजारी असणाऱ्या एका इमारतीवर खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) समर्थक खासदार उदयनराजे यांचे चित्र रेखाटण्यासाठी प्रयत्न करतायत त्याला मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे पोलिसांमार्फत विरोध केला.

त्यामुळे पोवई नाक्यावर तणाव पूर्ण शांतता निर्माण झाली हाेती. या भागात पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला हाेता. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक हे खासदार उदयनराजे यांचे या भिंतीवर चित्र काढण्यासाठी आक्रमक आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हा वाद पेटला हाेता.

मंत्री देसाईंचा इशारा

मंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र असा कोणताही वाद नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मात्र कोणतही विना परवाना कृत्य सहन केलं जाणार नाही उदयनराजेंच्या चित्रावर शंभुराज देसाईं यांनी इशारा दिला. वेळ प्रसंगी कायद्याचा वापर करावा लागला तरी चालेल असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला.

सकारात्मक चर्चा

या प्रकरणावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. परंतु केवळ 2 मिनटात ही बैठक गुंडाळून शंभूराज देसाई बाहेर पडले. अखेर कार्यकर्त्यांना बैठकीबाबत विचारले असता सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत सुनील काटकर (उदयनराजे समर्थक) यांनी दुजाेरा दिला.

शिवेंद्रराजेंची टाेलेबाजी

या संपूर्ण प्रकरणावर आमदार शिवेंद्रराजे यांनी जोरदार फटके बाजी करत खासदार उदयनराजे यांच्यावर जोरदार उपराेधक टीका केली आहे. खासदार उदयनराजे यांच्या चित्राचा वाद हा महाराष्ट्र , कर्नाटक सीमावाद आणि जम्मू-काश्मीरच्या वादापेक्षाही गहन वाद आहे. राज्यसभेचे खासदार उदयनराजे यांचे चित्र काढायला देत नाहीत याची चर्चा राज्यसभेत होणार असल्याची माहिती मला समजत आहे.

खासदार उदयनराजे यांचे चित्र नेमकं कुठं काढायचं याचा निर्णय आता राज्यसभाच देईल. चाललेला प्रकार म्हणजे बालिशपणाचा कळसच आहे. चित्र भिंतीवर काढण्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावरच काढा असा उपरोधक टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लावला आहे.

पुढं बाेलताना शिवेंद्रराजे म्हणाले मराठीत एक म्हण आहे साठी बुद्धी नाठी. आता नुकताच उदयनराजे यांचा वाढदिवस झाला आहे. त्यांची वाटचाल साठीकडे सुरू आहे. ही म्हण त्यांना लागू होऊ नये म्हणून त्यांनी वेळीच कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे असा सल्ला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना दिला आहे. (Maharashtra News)

एका चित्रावरून पेंशनरांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या शांत साताऱ्याचे वातावरण गेल्या चार दिवसांपासून चांगलच ढवळून निघालं आहे. स्टेजवरून पुष्पा चित्रपटातील झुके गा नहीं साला अशी डायलॉग बाजी करुन तरुणाईला घायाळ करणारे खासदार उदयनराजे आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT