सातारा : राज्य सरकार (maharashtra government) आणि केंद्र सरकारच्या (central government) माध्यमातून किती निधी आणला हे उदयनराजेंनी (Udayanraje) जाहीर करावं असे आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendrasinhraje bhosale) यांनी आज (शुक्रवार) खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी सातारा (satara) येथे दिले. दरम्यान यंदाच्या पालिका निवडणुकीत सातारकर सातारा विकास आघाडीस घरी बसवतील असा विश्वास आमदार भाेसले यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला. (Satara News)
पालिका निवडणुकीवरून साताऱ्याचे दोन्ही राजेंमध्ये जोरदार पत्रकबाजी सुरू झाली आहे. आता पत्रकबाजी नंतर शिवेंद्रराजेंनी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना उदयनराजेंच्या एकूण कार्यक्षमतेवर टीकास्त्र सोडलं आहे.
शिवेंद्रराजे म्हणाले मला पत्रक बाजी करण्यात हौस नाही. सर्व सामान्य म्हणून निवडून आलेल्या नगराध्यक्ष यांना पालिकेत काम करून दिले गेले का? पालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. यांचेच कार्यकर्ते टेंडर घेतात. ४ वर्ष ११ महिने काही केले नाही. आता मात्र मोठे आकड्याचे लोकांना दाखवले जाताहेत.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून किती निधी आला ते उदयनराजे यांनी जाहीर करावे असे आव्हान शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना दिलं आहे. दरम्यान एका प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले माझा पराभव वडिलांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी दगाफटका केला म्हणून झाला पण तुम्ही राष्ट्रवादीकडून उभे असताना निवडून येता आणि चार महिन्यात पुन्हा भाजपात जावून निवडणूक लावल्यावर लोकांनी का पराभव केला हे तपासावे अशी बोचरी टीका केली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.