Satara, Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale saam tv
महाराष्ट्र

Satara : लग्न मालक राहिला बाजूला अन, वाढप्यांचीच पळापळ ! शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टाेला

गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरात दाेन्ही राजे विकासकामांचे भूमिपूजन करीत आहेत.

Siddharth Latkar

Shivendraraje Bhosale : सातारा पालिका (Satara Muncipal Council) हद्दवाढ भागात मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून ४८ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला. या निधीतून शाहूनगर, गोळीबार, विलासपूर, शाहूपुरी आदी भागातील विकासकामे मार्गी लागणार आहेत. मात्र याचे श्रेय आपल्याला मिळावे म्हणून नारळफोड्या गँगने नारळ फोडण्याचा कार्यक्रम पार पाडला. या गँगची अवस्था म्हणजे लग्नातील वाढप्यांसारखी झाली आहे. लग्न मालक ज्याने सगळं केलं आहे, तो राहिला बाजूला अन, नुसती वाढप्यांचीच पळापळ सुरु आहे, असा खोचक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale Latest News) यांनी विरोधकांना लगावला.

राज्य शासनाच्या ४८ कोटी निधीमधून शाहूनगर, गोळीबार मैदान, विलासपूर, शाहूपुरी आदी भागात रस्ते, गटर, पथदिवे आदी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचा प्रारंभ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) आणि सातारा विकास आघाडीच्या भ्रष्ट कारभाराचा खरपूस समाचार घेतला.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले निधी मिळून सहा महिने उलटले पण, काही लोकांनी मर्जीतल्या ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठी निधी पडून ठेवला आणि या भागातील विकासकामे रखवडली. ज्यावेळी पालिकेत सत्ता होती, त्याकाळात हद्दवाढ भागासाठी सातारा विकास आघाडीने किती कामे केली? आता मुख्याधिकारी प्रशासक असून त्यांना मंजूर कामे तातडीने घेण्याच्या सूचना केल्या आणि आता हि रखडलेली कामे मार्गी लागत आहेत.

कोणीतरी स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे. ते कोण आणि काय आहेत, हे सातारकरांनी आणि हद्दवाढ भागातील नागरिकांनी चांगलेच ओळखले आहे. मी जे काम केले आहे, तेच मी केले असे सांगतो. मी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय कधीच घेत नाही.

त्यांनी एक चांगलं काम केलं, ग्रेड सेपेरेटरचं! हो ते त्यांचं काम आहे, त्याला मी त्यांनीच केलं असं म्हणणार. काम किती चांगलं आहे हे लोकांनाही माहिती आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यानी सत्ता काळात किती भ्रष्टाचार केला हे सर्वानीच उघड्या डोळ्यांनी पहिले आहे. त्यामुळे आता दुसऱ्यानी मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडून उगाच शायनिंग करू नये. आता तुमची वेळ संपली असून सातारकर तुम्हाला घरी बसवणार आहेत, याचे भान कायम ठेवा असेही शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले. (Maharashtra News)

सातारा पालिका हद्दीतील अनेक विकासकामे येत्या काही दिवसात मार्गी लागणार आहेत. त्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केले आहेत. यावेळी विलासपूर, शाहूनगर, गोळीबार मैदान परिसरातील असंख्य महिला, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

Government Scheme: या सरकारी योजनेत लाडक्या बहिणींना मिळतात २ लाख रुपये; मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे तरी काय?

Matar Usal Recipe : थंडीच्या दिवसांत बनवा गरमागरम 'मटार उसळ', एकदा खाल तर खातच राहाल

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT