Shivendraraje and Udayanraje Join Hands saam tv
महाराष्ट्र

Election : ऐन निवडणुकीत साताऱ्याची राजकीय हवा बदलली; शिवेंद्रराजे-उदयनराजे यांचं मनोमिलन, भाजपच्या कमळ चिन्हावरच...

Shivendraraje Bhonsle - Udayanraje Bhosale : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत साताऱ्यातील राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांचं मनोमिलन झालंय. त्यावर स्वतः शिवेंद्रराजेंनी शिक्कामोर्तब केलंय.

Nandkumar Joshi

  • ऐन निवडणुकीत साताऱ्यात दोन्ही राजेंचे मनोमिलन

  • मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं शिक्कामोर्तब

  • भाजपच्या कमळ चिन्हावरच दोन्ही आघाड्या पालिका निवडणूक लढवणार

ओंकार कदम, सातारा | साम टीव्ही

राज्यात स्थानिक निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, अनेक ठिकाणी महायुतीतील मित्रपक्ष, तर महाविकास आघाडीमधील घटकपक्षांमध्येच गट-तट पडलेले आहेत. स्थानिक पातळ्यांवर आघाडी-बिघाडीचं राजकारण सुरू आहे. निवडणुकीचा आखाडा तापला असतानाच, साताऱ्यात मात्र वेगळ्याच दिशेने वारे वाहू लागले आहेत. साताऱ्यातील दोन्ही राजेंचे मनोमिलन झाल्याचं चित्र बघायला मिळालं. तसे संकेतच स्वतः शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत.

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी नगराध्यक्ष व्हायचं आहे, मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसंच शिवेंद्रराजेंच्या गटासोबत मनोमिलन करण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. त्यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली होती. पण शिवेंद्रराजेंनी आपले राजकीय पत्ते उघडले नव्हते. अखेर आता त्यावरचा पडदा उघडला आहे. उदयनराजेंच्या आघाडीसोबत मनोमिलन होणार असल्याचे संकेत स्वतः शिवेंद्रराजे यांनी दिले आहेत.

साताऱ्यात आज भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही नेत्यांच्या आघाडीचे इच्छुक उमेदवार या मुलाखतीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलाखतीवेळी भाजप आणि दोन्ही राजेंच्या दोन्ही आघाड्या एकत्र दिसल्या. या मुलाखती दरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांची बोलताना मंत्री शिवेंद्रराजे यांनी दोन्ही राजेंच्या मनोमिलनाबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.

मी आणि उदयनराजे भाजप म्हणून एकत्र निवडणुका लढणार आहोत. यामध्ये आमच्या दोघांची कुठलीही वेगळी भूमिका नाही, असे म्हणत मनोमिलन झाल्याचे स्पष्ट संकेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.

ज्यांनी मुलाखती दिल्या आहेत, त्यांच्या नावांची यादी मुंबईला पाठवली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्याची बैठक घेऊन यादी मांडणार आहे. नेमकं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदाबाबतची यादी अंतिम करतील, असे शिवेंद्रराजेंनी सांगितले. एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिका निवडणूक भाजप आणि दोन्ही राजेंच्या आघाड्या एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

Maharashtra Live News Update : मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरात अलर्ट

Delhi Blast: दिल्लीत मोठा स्फोट, वाहनं पेटली; आग अन् धुराचे लोट; पाहा घटनेचा पहिला VIDEO

Aadhaar App: आधारचे नवे अ‍ॅप लॉंच, मोबाईलमध्येच वापरता येणार खास फिचर्स, घरबसल्या होतील सगळी कामे

Delhi Red Fort Blast: देशात खळबळ! दिल्लीत मोठा स्फोट, एकाचा मृत्यू|VIDEO

SCROLL FOR NEXT