Shiv Sena’s Sanjay Raut Responds to Bhai Jagtap Saam Tv
महाराष्ट्र

महापौराचं काय आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचाय, भाई जगतापांच्या स्वबळाच्या दाव्यावर संजय राऊत भडकले

Shiv Sena’s Sanjay Raut Responds to Bhai Jagtap: काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचा दावा केला होता. या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Bhagyashree Kamble

  • जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचा दावा केला.

  • 'स्थानिक नेत्यांऐवजी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करू'- राऊत

  • काँग्रेस नेते भाई जगतापांच्या वक्तव्यावर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाआघाडीच्या नेत्यांकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. या निवडणुका एकत्र लढवाव्यात की स्वतंत्र, याबाबत पक्षांच्या नेत्यांकडून मत विचारले जात आहे.

अशातच मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा दावा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीत बिघाडी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. भाई जगताप यांच्या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'युतीसंदर्भात स्थानिक नेत्यांशी नसून, दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करू'; असं संजय राऊत म्हणाले.

भाई जगताप यांच्या दाव्यावर संजय राऊत म्हणाले, 'कोण काय बोलतं, मी त्यावर मत व्यक्त करणार नाही. काँग्रेस हा आमचा महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने जर तो निर्णय घेतला असेल तर, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे. आम्हाला काही अडचण आली तर, आम्ही राहूल गांधी यांच्याशी चर्चा करू. राहूल गांधींव्यतिरिक्त पक्षातील इतर चार प्रमुख नेते आहेत, त्यांच्याशी बोलू', असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

आम्हाला काँग्रेसचा प्रधानमंत्री करायचा होता, असं संजय राऊत म्हणाले. 'ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे. ही बाब काँग्रेसने समजून घ्यायला हवी. आम्हाला काँग्रेसचाच प्रधानमंत्री करायचा होता. पण नाही होऊ शकला ना, आम्ही INDIA आघाडी तयार केली. आम्हाला राहूल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं. आम्ही असं नाही म्हणालो की, शिवसेना किंवा अन्य पक्षाचा करायचा आहे. आमचे विचार आणि मत पारदर्शक आहे', असं संजय राऊत म्हणाले.

'काँग्रेस दिल्लीत सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आहेच. आमचं मन फार मोठं आहे. आम्हाला राहूल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. मुंबईचा महापौर पद घेऊन काय बसलेत ते महाशय', असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाई जगताप यांना लगावला आहे. 'काँग्रेसची साथ सोडणार नाही असा प्रश्नच कुठे निर्माण झाला नाही. मुंबईतल्या प्रत्येक समाजातील माणूस हा आमच्या सोबत आहे', असंही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: गोड बातमी मिळेल,लॉटरी लागणार; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल आनंदाचा

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

डोळ्यांना इजा, एक मुलगा कायमची अंधत्व; कार्बाईड गनचा कहर

Raireshwar Fort: भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर दारू पार्टी; मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप, व्हिडिओ व्हायरल

Pune Politics Heat Up: धंगेकर विरुद्ध मोहोळ! पुण्यात महायुतीत राजकीय संघर्ष पेटला

SCROLL FOR NEXT