Uddhav Thackeray Offer to Nitin Gadkari  Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: आमचं सरकार सत्तेत येतंय, तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ; उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना पुन्हा ऑफर

Uddhav Thackeray Speech: केंद्रात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार असून तुम्ही आमच्यासोबत आल्यास मोठं मंत्रीपद देऊ, अशी खुली ऑफर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे नितीन गडकरी यांना दिली आहे.

Satish Daud

Uddhav Thackeray Offer to Nitin Gadkari

केंद्रात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार असून तुम्ही आमच्यासोबत आल्यास मोठं मंत्रीपद देऊ, अशी खुली ऑफर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे नितीन गडकरी यांना दिली आहे. मोदींसमोर कशाला झुकता, महाराष्ट्राचं पाणी काय आहे, हे दाखवून द्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते यवतमाळच्या पुसद येथील जाहीर सभेतून बोलत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून राज्यात ठिकठिकाणी वादळी सभा घेत आहेत. भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा, असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मतदारांसह शिवसैनिकांना करत आहे.

उद्धव ठाकरेंची गडकरींना पुन्हा ऑफर

पुसद येथील जाहीर सभेत शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "नितीन गडकरी हे तत्कालिन युती सरकारमधील धाडसी मंत्री होते. त्यांचा वेगळाच रुबाब होता. गडकरींनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण केलं".  (Latest Marathi News)

"नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याबद्दल आम्हाला नक्कीच अभिमान आहे. पण गेल्या आठवड्यात भाजपने लोकसभेच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मोदी अमित शहा यांची नावे आहेत. इतकंच नाही, तर कृपाशंकर सिंह यांच्यासारख्या माणसाचे नाव आहे. पण गडकरींचं नाव नाही. भाजप त्यांना उमेदवारी देणार की नाही, याबाबत मला कल्पना नाही".

पण नितीन गडकरी महाविकास आघाडीसोबत आल्यास आम्ही त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. देशात आमचं (महाविकास आघाडीचं) सरकार येणार असून आम्ही तुम्हाला मोठं मंत्रीपद देऊ, अशी खुली ऑफर देखील उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील एका जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना खुली ऑफर दिली होती. ठाकरेंच्या या ऑफरवर गडकरींनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिल्यानंतर गडकरी काही बोलणार का, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT