Roha Shiv Sena leader resigns https://x.com/SunilTatkare
महाराष्ट्र

Maharashtra politics : अजितदादांचा ठाकरेंना धक्का, रायगडच्या हुकमी एक्क्याने मशाल सोडली

Shiv Sena Thackeray setback : रायगडच्या रोहा तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, समीर शेडगे यांनी मशाल सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हा मोठा राजकीय बदल.

Namdeo Kumbhar

Roha Shiv Sena leader resigns join NCP : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभेनंतर राजकीय धक्के बसत आहे. विशेषकरून कोकणातून दिग्गज नेते ठाकरेंची साथ सोडत आहेत. रायगडमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलाय. शेडगे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. रविवारी रोहा येथील राम मारुती चौकात झालेल्या जाहीर सभेत शेडगे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती होती.

रोहा येथे माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रोहा तालुका अध्यक्ष समीर शेडगे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व नेत्यांचे पक्षात हार्दिक स्वागत करून त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अधिक वाढणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत भाई तटकरे, मधुकर पाटील, विनोद पाशीलकर, बंधू मोरे, सुरेश मगर, संतोष पोटफोडे, अमित उकडे, अहमद दर्जी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सुनील तटकरे

समीर शेडगे हे रोहा तालुक्यातील प्रभावी नेतृत्व आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जातात. शेडगे यांनी साथ सोडल्यामुळे रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. रायगडमधील स्थानिक पातळीवरील पक्षाची ताकद कमकुवत होण्याची शक्यता आहे. प्रवेश सोहळ्यात बोलताना सुनील तटकरे यांनी शेडगे यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, “समीर शेडगे यांचा अनुभव आणि जनसंपर्क यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला रोहा तालुक्यात बळ मिळेल. त्यांच्या पक्षप्रवेशाने पक्षवाढीला निश्चितच चालना मिळेल.”

आदिती तटकरे यांनीही शेडगे यांच्या निर्णयाचे कौतुक केले आणि कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. या पक्षांतरामागे स्थानिक राजकारणातील बदलते समीकरण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा प्रभाव असल्याची राजकीय चर्चा आहे. शेडगे यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

26th July Rain : पालघरसह पुण्याला रेड अलर्ट, पाऊस धुमाकूळ घालणार, दोन जिल्ह्यात शाळांना सुट्टी

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

SCROLL FOR NEXT