SHIV SENA CASE SHINDE FACTION MAKES BIG CLAIMS IN SUPREME COURT HEARING saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

Shiv Sena Symbol Supreme Court Hearing: शिवसेना पक्षावरील वादाच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. शिवसेनाप्रमुख पद, पक्षातील लोकशाही आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत शिंदे गटाने भूमिका मांडली.

Bharat Jadhav

  • शिवसेना पक्षाच्या वादावर सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे.

  • शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केल्याचे वृत्तात नमूद आहे.

  • पक्षातील लोकशाही संपवली, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला

बाळासाहेब ठाकरे यांनीही निवडणूक आयोगाचे अधिकार मान्य केलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी पक्षातील लोकशाही संपवली, असा युक्तिवाद एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी केला. यासह नीरज कौल यांनी शिवसेनाप्रमुख पदाबाबत मोठा धक्कादायक दावा केलाय. शिवासेना पक्ष कोणाच्या याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या युक्तीवादानंतर आता शिंदे गटाकडून युक्तीवाद केला जातोय. आज झालेल्या सुनावणीत शिंदे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर घेण्यात आलेल्या आरोपांवर उत्तर देण्यात आले. आयोगाचे निर्णय कशा पद्धतीने योग्य होते, याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला.

निवडणूक आयोगाचे अधिकार मान्य

बाळासाहेब ठाकरेंनी 1999 सालची घटना निवडणूक आयोगासमोर आणल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यामध्ये काही बदल करण्याच्या सूचना केल्या. ते मान्य करत बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकार मान्य केले होते. पण 2018 साली उद्धव ठाकरे यांनी त्या घटनेमध्ये बदल केला, जो अवैध होता. पक्ष घटना योग्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळेच त्यांनी 2018 सालची घटना ही योग्य नव्हती, असा निर्णय दिला, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी केला.

शिंदेंचीच शिवसेना मूळ पक्ष कसा?

उद्धव ठाकरेंनी पक्षातील लोकशाही संपवून सर्व अधिकार स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पक्षात असंतोष निर्माण झाला होता. शिवसेनेच्या विचारांच्या विरोधात असलेल्या पक्षाशी युती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्याआधारेच एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष मूळ शिवसेना असल्याचा दावा केल्याचं वकिलांनी सांगितलं.

राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवताना विधिमंडळातील आमदारांची संख्या पाहणे गरजेचं असतं हे आधी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या प्रकरणात विधिमंडळातील आमदारांची संख्या निवडणूक आयोगाने लक्षात घेतल्याचा दावाही शिंदे गटाने केलाय. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगवेगळे मुद्दे असले तरी जर राजकीय पक्षात मतभेद असतील तर पक्ष कुणाचा निर्णय हा पक्षाच्या संविधानाच्या आधारे घ्यायचा असतो.

शिवसेनाप्रमुख पदावर मोठा दावा

शिवसेनाप्रमुख पद हे 2013 पर्यंत होतं. पण बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर हे पद गोठवण्यात आलं. त्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष हे पद अस्तित्वात आलं. उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष असताना शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुका झाला नाहीत. निवडणुका घेणयाची जबाबदारी कुणाची होती? या चुका उद्धव ठाकरे यांनी सुधारायला हव्या होत्या, असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT