Manasvi Choudhary
हिंदू संस्कृतीत पूजा-अर्चा, सण-समारंभ आणि धार्मिक विधींना विशेष महत्त्व आहे. या प्रत्येक विधीसाठी काही नियम आणि परंपरा देखील आहेत.
अनेकदा आपल्याला घरातील मोठ्या मंडळीकडून, पूजेच्या वेळी किंवा मंदिरात जाताना काळे कपडे घालू नका असे सांगितले जाते. पण यामागचे नेमके कारण काय? तुम्हाला माहित आहे का?
पूजेदरम्यान काळ्या रंगाचे वस्त्र परिधान का टाळतात? यामागील धार्मिक आणि सांस्कृतिक कारण काय आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. पण, पूजेच्या वेळी मन एकाग्र, शांत आणि सकारात्मक ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते, यामुळे काळे कपडे पूजेमध्ये परिधान करणे टाळतात.
पूजेच्या वेळी सकारात्मक मनाला प्रसन्न वाटणारे हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. यामध्ये तुम्ही लाल , नारंगी, पिवळा आणि पांढरा या रंगाचे कपडे घाला.
काळा रंग पूर्णपणे निषेध आहे असे नाही. काही विशिष्ट धार्मिक परंपरा आणि श्रद्धेनुसार, भगवान शनिदेव आणि माता काली यांच्या पूजेमध्ये काळ्या रंगाचे कपडे किंवा काळे वस्त्र वापरले जाते.
शनिवारी शनिदेवांच्या पूजेसाठी काळे कपडे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.