Eknath Shinde And Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Assembly Election 2024: कोकणात ठाकरे- शिंदेंच्या शिवसेनेचाच दबदबा! काँग्रेस- भाजपचे एक पाऊल मागे; जागा वाटपाचे गणित काय?

Maharashtra Assembly election 2024: कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, लोकसभा निवडणूकीत भाजप शिवसेनेपेक्षा वरचढ ठरली. मात्र विधानसभा निवडणुकीत चित्र फार वेगळ असणार आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरु झाली आहे. कोकणात देखील राजकीय रंग पहायला मिळत आहे. अद्याप राजकीय पक्षाचे उमेदवार जरी अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी इच्छुंकाची गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, लोकसभा निवडणूकीत भाजप शिवसेनेपेक्षा वरचढ ठरली. मात्र विधानसभा निवडणूकीत चित्र फार वेगळ असणार आहे.

कोकणात जागा वाटपात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे मोठा भाऊ ठरणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार तयारी केली असून दोन्ही जिल्ह्यात सर्वाधिक जागांवरती आपला उमेदवार उभा करण्याची तयारी दर्शवली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्ह्यातील आठ पैकी सात जागा लढणार शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष लढवणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली.

ठाकरे गट लढणार सर्वाधिक जागा!

रत्नागिरी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे आपला उमेदवार उभा करणार आहे. सिंधुदूर्गच्या राणेंच्या बालेकिल्ल्यात तिन्ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष लढणार आहे. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्ह्यातील 8 विधानसभा जागा आहेत त्यापैकी 7 जागांवर उद्धव ठाकरेंचे शिलेदार लढणार आहेत.

काँग्रेस देखील या दोन्ही जिल्ह्यात अग्रेसर आहे, या जिल्ह्यात काँग्रेसला जागा मिळावी असा दावा काँग्रेसने केलाय यामध्ये प्रामुख्याने लांजा - राजापूर मतदारसंघाची मागणी काँग्रेसने केली आहे. 2019 च्या निवडणूकीत काँग्रेसचा या मतदार संघात निसटता पराभव झाला होता मात्र आता त्याकाळी विरोधी पक्ष असलेला शिवसेना पक्ष आता मित्र पक्ष असल्याने काँगेसची अडचण झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने 8 जागांपैकी चिपळूण विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सोडली आहे. या मतदार संघात प्रशांत यादव विरुद्ध शेखर निकम अशी लढत होईल.

भाजपचीही माघार!

दुसरीकडे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षही नमते घेणार आहे. दोन्ही जिल्ह्यात भाजप फक्त 1 जागा लढवण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजप एकही जागा लढवणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना चार, तर चिपळूणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार आहे. सिंधुदुर्गमध्ये 1 जागा भाजप लढवणार, 2 जागा शिंदेंची शिवसेना लढवणार आहे आणि भारतीय जनता पक्ष १ जागा लढवणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत यश मिळूनही भाजप एक पाऊल मागे जात असल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर पसरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT