सागर निकवाडे, साम प्रतिनिधी
आमदार आमश्या पाडवी यांच्या जामीन अर्जावर शहादा कोर्टाने आज जामीन मंजूर केला. आदिवासी महिलेच्या विनयभंग प्रकरणी काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामीन मंजूर झाल्याने पाडवींना दिलासा मिळाला आहे.
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा विनयभंग यासारख्या विविध कलमाखाली आमदारांवर गुन्हा दाखल झालाय. अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा गावात ग्रामपंचायतच्या विकास कामावरून दोन गटात वाद झालं होता. त्यावरून अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आज शहादा कोर्टाने आमश्या पाडवी यांना दिलासा दिलाय.
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीमधील दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील वाद झाला होता. अक्कलकुनवाच्या सोरापाडा येथे दोन गटात वाद झाला होता. याप्रकरणात आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोप करणारी महिला आणि तिचा भाऊ भाजपचे कार्यकर्ते आहेत. या महिलेचा भाऊ भाजप पंचायत समिती सदस्य असल्याचं सांगितलं जातय.
ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी यांच्याविरोधात काम केल्याचा रागातून हा वाद झाला होता. कुटुंबातील सदस्य आणि महिलेला मारहाण झाल्याचा आरोप आमश्या पाडवी यांच्यावर आहे. आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी यांच्यासह कार्यकर्ते यांच्यावर अक्कलकुवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.