satara, eknath shinde, chandrakant jadhav, shivsena , shivsainik saam tvn
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : सच्च्या शिवसैनिकाने वाढदिनी साेडली उद्धव ठाकरेंची साथ; एकनाथ शिंदेंचे मजबूत केले हात

साताऱ्यातून ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

ओंकार कदम

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समवेत गुवाहटीस गेलेल्या आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या घरावर पक्षाच्या आदेशानूसार नाेटीस लावणा-या सातारा (Satara) जिल्ह्यातील एका शिवसेना (Shivsena) प्रमुखाने नुकतीच शिंदे गटात उडी मारली आहे. यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सातारा जिल्ह्यावरील पकड मजबूत करावी लागणार आहे. (Uddhav Thackeray News)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Birthday) यांचा आज (बुधवार) वाढदिवस आहे. या निमित्त राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसैनिकांनी विविध उपक्रमांचे आयाेजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Satara News)

दरम्यान साता-यात ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला. सध्याचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. जाधव यांचा प्रवेश म्हणजे साताऱ्यातून शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. (Shivsena News)

chandrakant jadhav with cm eknath shinde

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशीच चंद्रकांत जाधव यांनी सेनेला जय महाराष्ट्र केल्याने साता-यातील शिंदे गट मजूबत झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: घाटकोपर पूर्वमधून पराग शाह विजयी

Eknath Shinde News : हा विजय न भूतो न भविष्यति आहे, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | VIDEO

Naresh Mhaske: महायुतीचा हा एकतर्फी विजय आहे, नरेश म्हस्के यांनी दिली प्रतिक्रिया| Video

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले लाडक्या बहीणींचे आभार

SCROLL FOR NEXT