महाराष्ट्र

Shushma Andhare: जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैसे वाटप; सुषमा अंधारेंच्या आरोपानं खळबळ

Shushma Andhare Allegation : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जून रोजी निवडणूक पार पडत आहे. प्रचाराला वेग आला असून मविआ आणि महायुती लोकसभेनंतर पुन्हा आमने-सामने आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जळगावातील सभेनंतर पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. तर शिंदे सेनेनं हे आरोप फेटाळलेत. पाहूया एक रिपोर्

Girish Nikam

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. लोकसभेनंतर या पाच जागांसाठी निवडणूक होत असल्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला. शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये बैठका घेतल्या.

मात्र जळगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आलंय. कुठे आहे निवडणूक आयोग?, असा सवाल अंधारेंनी केलाय. दुसरीकडे शिंदे सेनेनं सुषमा अंधारे यांचे आरोप फेटाळले आहेत.

सुषमा अंधारे यांच्या आरोपाला खासदार संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिला आहे. निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनीही केलाय. उमेदवारांकडून शिक्षकांना रेमंडचे सफारी कापड, पैठणी, नथ अशा महागड्या वस्तूंचं वाटत केल्याचा आरोप केलाय.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जुन रोजी मतदान पार पडणार आहे. मतदारांना लोभ दाखवणे अयोग्य आहे. निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहण महत्वाचं आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाकडून किशोर दराडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे महेंद्र भावसार, मविआकडून संदीप गुळवे रिंगणात आहेत. तर विवेक कोल्हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. नाशिकमधील या चौरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT