Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde: सत्ता स्थापनेआधी नवा ट्विस्ट येणार? शिवसेना खासदारांचा काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदेंना फोन कॉल

Shiv Sena MP Call To Shinde: शिवसेना खासदारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करत महत्त्वाची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे देऊ नयेत असा सल्ला दिलाय. त्यामुळे सत्तास्थापनेआधी नवा ट्विस्ट येणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

Bharat Jadhav

महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू आहे. भाजप गृहखातं सोडायला तयार नाहीये तर शिवसेना गृहखात्यासाठी ठाम आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेतील गृहखात्याचा हा कलह शिगेला पोहोचलाय. आता महायुतीच्या सत्ता स्थापनेआधी मोठा खेळ होण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीतील शिवसेनेच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंना फोन कॉल करत सरकारच्या मंत्रिमंडळात शिंदे न राहिले तर काय परिणाम होतील याची माहिती दिलीय.

भाजप आणि शिवसेनेत वाद

महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलाय. मुहूर्त ठरला असला तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. भाजप आणि शिवसेना दोन्हीही पक्ष गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. 'मुख्यमंत्रिपद भाजपकडे तर गृहमंत्रिपद आम्हाला पाहिजे असं सांगत शिवसेनेने पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर दावा केलाय. दरम्यान विधानसभेच्या निकालानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून वाद सुरू झाला.

मात्र भाजपला १३७ जागा मिळाल्याने भाजपचं मुख्यमंत्री होणार असल्याचं हे स्पष्ट संकेत होते. दिल्लीतील अमित शहा यांच्या बैठकीतही भाजपाचच मुख्यमंत्री होणार असून तो चेहरा देवेंद्र फडणवीस असणार हे शहांनी एकनाथ शिंदेंना ठणकावून सांगितलं.

तर अजित पवार आणि शिंदे गटाला उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं. मात्र या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज होते. त्यानंतर शिंदे गटाने गृहमंत्रिपदासाठी भाजपवर दबाव टाकणं सुरू केलं. मागील सरकारच्या पॅटर्न प्रमाणे भाजपकडे जसे उपमुख्यमंत्रिपद होतं आणि गृहमंत्रिपद होतं. तोच पॅटर्न आताही असावा. त्याचप्रमाणे शिंदे गटाकडे गृहमंत्रीपद असावं अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जाऊ लागलीय.

खासदारांचा फोन कॉल

इतकेच नाही तर शिंदे गटाने गृहमंत्रिपदाऐवजी इतर महत्त्वाची खाती सुद्धा मागितली आहेत. त्यामुळे महायुतीतील खातेवाटप संदर्भात कोणताच निर्णय होऊ शकलेला नाहीये. राज्यातील विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात झाल्या. या निवडणुकीत महायुतीला मोठं यश देखील मिळालं असून एकनाथ शिंदे यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे असा सुचक इशारा आमदार दिपक केसरकर यांनी दिलाय. अशात दिल्लीतील शिवसेना खासदारांना एकनाथ शिंदेंना फोन करत त्याचं सरकारमध्ये राहणं किती महत्त्वाचं आहे हे सांगितलंय.

सरकारमध्ये नसल्यास होतील वाईट परिणाम

शिवसेना खासदारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन कॉल करत सरकारमध्ये राहण्याविषयी सांगितले. एकनाथ शिंदे मंत्रीमंडळात सहभागी झाले नाही तर काय परिणाम होईल यांची कल्पना खासदरांनी शिंदेंना दिलीय. तसेच महत्त्वाची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे देऊ नये, असा सल्लाही खासदारांनी दिलाय. तुम्ही मुख्यमंत्री राहिल्यामुळं प्रशासनावर तुमची पकड निर्माण झालीय. त्यामुळं प्रशासनावर तुमचा जो वचक असेल तसा वचक दुसरा कोणाचाही नसेल अशीही भावना खासदारांनी व्यक्त केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT