Washim National Highway Saam Tv
महाराष्ट्र

Washim National Highway : वाहतूक कोंडी, अपघात कमी होणार, वाशिममधील राष्ट्रीय महामार्गात मोठा बदल होणार; महत्वाची माहिती समोर

Washim ational Highway : वाशिम शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ फोर-लेनचाच होणार असून, या कामासाठी केंद्र सरकारने ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Alisha Khedekar

  • वाशिम शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ फोर-लेनचा होणार.

  • कामासाठी केंद्र सरकारने ८९ कोटी रुपये मंजूर केले.

  • एकूण ५.११ किमी लांबीचा रस्ता तयार होणार आहे.

  • खासदार संजय देशमुख यांनी गडकरींची भेट घेत स्पष्टता दिली.

वाशिम शहरासाठी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अखेर फोर-लेनचा होणार असल्याची माहिती यवतमाळ–वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महामार्गाचे अकरा किलोमीटरचे सुरुवातीचे नियोजन आता ५. ११ किलोमीटरवर स्थिरावले असून, या कामासाठी केंद्र सरकारने ८९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

या प्रकल्पामुळे वाशिम शहरातून जाणाऱ्या वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होणार आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा, अफवा, तर्क-वितर्क सुरू होते. काहींनी हा महामार्ग केवळ दोन लेनचा केला जात असल्याचा दावा केला होता. मात्र, खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या प्रकल्पाच्या स्वरूपावर सविस्तर चर्चा केल्यानंतर खासदार देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले की, महामार्ग निश्चितच फोर-लेनचा राहणार आहे.

या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आणि काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते, यावरून या निर्णयासाठी सर्वपक्षीय सहमती मिळाल्याचे संकेत मिळत आहेत. महामार्गाचा फोर-लेनचा मार्ग वाशिमच्या शहरी आणि ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि प्रवासाचा कालावधी या तिन्ही बाबींमध्ये मोठा फरक पडणार आहे.

महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन खासदार देशमुख यांनी दिले. हा प्रकल्प राबवताना स्थानिकांचे हित लक्षात घेऊन काम करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाशिम शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग किती लेनचा होणार आहे?

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ फोर-लेनचा होणार आहे.

या प्रकल्पासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे?

८९ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे.

या महामार्गाची एकूण लांबी किती राहणार आहे?

या प्रकल्पाची लांबी ५.११ किलोमीटर राहणार आहे.

हा निर्णय कशामुळे महत्त्वाचा मानला जातो?

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शहरी व ग्रामीण भागात दळणवळण सुधारण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

Pune News: पुण्यात पोलिसांची दलित मुलींवर खोलीत घुसून मारहाण; कायद्याचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT