मनोज जयस्वाल
वाशीम : वाशीम जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नद्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली. दरम्यान रिसोड तालुक्यातून वाहणाऱ्या उतावली नदीला मोठा पूर आला होता. या पुराच्या पाण्यातून गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक टाकला. मात्र पुराच्या पाण्याचा अंदाज चुकल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. यात चालकाचा कॅबिनमध्येच अडकून मृत्यू झाला आहे.
संभाजीनगर- नागपूर महामार्गावर वाशिमच्या पिंपरी सरहद गावा जवळील घटना आहे. मुसळधार पाऊस झाल्याने उतावली पूर आला असताना पुलावरून पाणी जात होते. या पुराच्या पाण्यातून चालकाने ट्रक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ट्रक पलटी झाला. यामुळे चालकाला बाहेर निघता आले नाही. परिणामी ट्रक चालकाचा केबिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
सकाळी घटना आली उघडकीस
पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने मध्यरात्री दुर्घटना घडली. दरम्यान आज सकाळी सदर घटना गावाकऱ्यांच्या निदर्शनास आली. यानंतर काही जणांनी जाऊन ट्रकची तपासणी केली असता चालकाचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलीसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढून पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयाला पाठवला आहे.
अकोल्यातल्या कोळासा शेतशिवारात साचल ७ फूट पाणी
अकोला : अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातील कोळासा येथे ढगफुडी सदृश्य पाऊस झाला होता. त्यामुळं कोळासा आणि मनारखेड शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. शेतकरी संदीप घोंगे यांच्या शेतात असलेल्या सोयाबीनच्या साडेचार एकरातील दोन एकरात ६ ते ७ फूट पाणी साचलं आहे. त्यांचं पीक आता पूर्ण वाया गेल आहे. या पाण्यामध्ये चक्क शेतकरी आपल्याला पाण्यात उतरून किती फूट पाणी आहे, याच प्रात्यक्षिक दाखवत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.