Shiv Sena MLAs Angry with Ajit Pawar Over Fund Allocation, Complain to Eknath Shinde : निधी वाटपावरून महायुतीमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निधीवाटपावरून नाराज आहेत. अजित पवार यांची भूमिका उदासीन असल्याचं आमदारांचे म्हणणं असल्याचे समोर आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील खदखद समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार यावर काय तोडगा काढणार? याकडे महायुतीचे लक्ष लागलेय.
निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी अल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीत प्रथम निवडून आलेल्या आमदारांना विकास निधी दिला जाणार असल्याचेही समोर आलेय. विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या नीधीबाबत अजित पवार यांची भूमिका उदासीन असल्याची तक्रार आमदारांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे केली. याबाबत तीन्ही प्रमुख नेत्यांनी योग्य तो मार्ग काढावा अशीही आमदारांची भूमिका असल्याचे समजतये.
दरम्यान, याआधीही विविध मुद्द्यावरून महायुतीचे मतभेद समोर आले होते. विकास कामाच्या निधीबाबत अजित पवार यांची भूमिका उदासीन असल्याचे अनेक शिवसेना आमदारांना वाटतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर लवकरच तोडगा निघू शकते. फडणवीस, शिंदे अन् पवार यांच्यामध्ये याबाबत सविस्तर चर्चा होऊ शकते. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये खासगीत चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येतेय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आज नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग रचना व नगरपालिक व नगरपरिषद आरक्षण सोडतीनंतर बैठकीला विशेष महत्त्व मिळाले आहे. या सर्व गोष्टींना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.