सेना-राणे यांच्यातलं वैर संपेना, आता 'या' आमदारानं केली राणेंचा कोथळा काढण्याची भाषा Saam Tv News
महाराष्ट्र

सेना-राणे यांच्यातलं वैर संपेना, आता 'या' आमदारानं केली राणेंचा कोथळा काढण्याची भाषा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंगोली: कळमनुरीमधील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी थेट नारायण राणेंचा कोथळा बाहेर काढायचीच भाषा केल्याने शिवसेना-राणे हा वाद आणखीन पेटला आहे. सेना आमदाराच्या या वक्तव्याचा भाजपने ताव्र निषेध केला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्यातलं वैर काही संपताना किंवा कमी होताना दिसत नाहीय. (Shiv Sena MLA Santosh Bangar threatens to kill Narayan Rane)

हे देखील पहा -

नेमकं काय म्हणाले शिवसेना आमदार संतोष बांगर?

नारायण राणेंवर टीका करताना शिवसेना आमदार संतोष बांगर म्हणाले की, ”अरे तू काय सांगतो कुठं यायचं कुठं यायचं. तुझ्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. माझं पोलीस संरक्षण थोडसं बाजूला कर, हा संतोष बांगर शिवसेनेचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा एकटा येऊन, तुला चीत नाही केलं, तुझा जर कोथळा बाहेर नाही काढला, तर संतोष बांगर म्हणू नको.” अशा चिथावणीखोर शब्दांत त्या संतोष बागर यांनी नारायण राणेंना आव्हान दिलंय.

नारायण राणेंना शिवसेना सोडुन एक दशकापेक्षा जास्त काळ झाला आहे. असं असलं तरीही नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातलं वैर काही संपत नाही, किंबहुना कमीही होत नाही. सध्या भाजपवासी असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. त्यानंतर काल दुपारी राणेंना अटक झाली तर रात्री उशीरा जामीन मिळाला. त्यामुळे सेना-राणे-भाजप हा वाद आता आणखीनच चघळला आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीय. आता शिवसेनेच्या हिंगोलीमधील आमदाराने राणेंबद्दल प्रक्षोभक वक्तव्य करत आगीत तेल टाकायचं काम केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT