Shiv Sena MLA Disqualification Saam Digital
महाराष्ट्र

Shiv Sena MLA Disqualification: ''शिंदेंविरोधातील त्या ठरावावर माझी सही नाही...'', सुनावणीत आज काय घडलं?, जाणून घ्या

Shiv Sena MLA Disqualification: नागपूरमध्ये सरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड.. देवदत्त कामत यांच्याकडून शिंदेगटाच्या आमदारांची उलटतपासणी घेतायेत.

Sandeep Gawade

Shiv Sena MLA Disqualification

नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे राज्यातील राजकारण तापलं असतानाच हा विषय शिवसेना आमदार अपात्रेच्या सुनावणीपर्यंत पोहोचला आहे. नागपूरमध्ये सरू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड.. देवदत्त कामत यांच्याकडून शिंदेगटाच्या आमदारांची उलटतपासणी घेतायेत. आमदार दिलीप लांडे यांची कालपासून उलटतपासणी सुरू आहे. दरम्याज आज पुन्हा अ‍ॅड.. देवदत्त कामत यांनी दिलीप लांडे यांना, नवाब मलिक यांना सत्तेत सामावून घेण्याबाबत आक्षेप नोंदवला होता का, असा प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी एक अटेंडंटशिट सादर केली, जी २१ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीची होती. या अटेंडंटशिट २३ आमदारांच्या सह्या आहेत. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला होता. ज्याला उपस्थित २३ आमदारांनी अनुमोदन दिलं होतं. आमदार दिलीप लांडे यांनी मात्र या ठरावावर आपली खोटी स्वाक्षरी केल्याचा दावा केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपला पक्ष आणि शिवसेनेतील पदाधिकारी यांच्यात मोठी नाराजी आहे. पोलिसांच्या पोस्टिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात होते त्याचप्रमाणे तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांचे दाऊद सोबत संबंध होते. या दोन कारणामुळे पक्षात नाराजी होती. सध्याच्या महायुतीत नवाब मलिक यांना सामावून घेण्याबाबत आक्षेप नोंदवला होता का?असा प्रश्न अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी दिलीप लांडे यांना विचारला. त्यावर दिलीप लांडे यांनीही तेवढ्याच ठामपणे ते सत्तेत नसल्याचं उत्तर दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट; एक्स गर्लफ्रेंडवर २० हून अधिक वार, नंतर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

310 कोटींचा तोटा… एसटी तिकीट महागणार? महायुती सरकारने दिले संकेत|VIDEO

'त्याने सर्व निकष पूर्ण केलेत...'; १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात स्थान द्या, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

Maharashtra News Live Update: कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये भाव द्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

Kidney Damage Symptoms: सकाळी उठल्यावर हे ५ बदल जाणवतायेत?किडनी खराब होण्याची ही आहेत गंभीर लक्षणं, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT