Shiv Sena MLA Disqualification: उलटतपासणीत शिंदे गटाच्या आमदाराने दिली धक्कादायक उत्तरं, ठाकरे गटाच्या वकिलांकडून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न

Shiv Sena MLA Disqualification: नागपूर विधीमंडळ अधिवेशनात विधासभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदार अपात्रतेची सुणावणी सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष नोंदवण्यात आली असून अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी दिलीप लांडे यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.
Shiv Sena MLA Disqualification
Shiv Sena MLA DisqualificationSaam Digital
Published On

Shiv Sena MLA Disqualification

नागपूर विधीमंडळ अधिवेशनात विधासभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदार अपात्रतेची सुणावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी झाल्यानंतर आज ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड. देवदत्त कामत याच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी होईल. दरम्यान शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष नोंदवण्यात आली असून अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी दिलीप लांडे यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी पान क्रमांक २५ ते २८ हे दिलीप लांडे यांना दाखवण्यात दाखवण्याची विनंती केली. या कागदपत्रांना शिंदे गटाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. या कागदपत्रांची साक्षीदारांना माहिती नाही त्यामुळे या कागदपत्रांवर प्रश्न विचारण्यात येऊ नयेत, असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला. त्याला ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांची हरकत घेतली. तसेच जोपर्यंत आमच्याकडून ही कागदपत्रे तपासली जात नाहीत, तोपर्यंत त्यावर आमच्या साक्षीदाराला प्रश्न विचारण्यात येऊ नयेत असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. बराच वेळ या मुद्द्यावर दोन्ही गटांच्या वकीलांकडून युक्तीवाद सुरू होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shiv Sena MLA Disqualification
Maharashtra Politics: 'सत्तेपेक्षा देश महत्वाचा..' नवाब मलिकांना महायुतीत 'नो एन्ट्री'; फडणवीसांचे अजित पवारांना पत्र

दरम्यान ठाकरे गटाचे वकील अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे काही प्रश्न केले, त्यातील म्हत्त्वाचे मुद्दे

अ‍ॅड. देवदत्त कामत - उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना या राजकीय पक्षाचे नेते म्हणून शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत जी २३ जानेवारी २०१८ ला झाली तेव्हा नियुक्ती केली का ?

दिलीप लांडे : मला माहीत नाही

अ‍ॅड. देवदत्त कामत : आपल्या मते एकनाथ शिंदे हे शिवसेना या पक्षाच्या नेते पदी होते की नव्हते

दिलीप लांडे : मी शिवसेना पक्षात आल्यानंतर मला माहीत झाले

अ‍ॅड. देवदत्त कामत : याआधीच्या प्रश्नाच्या उत्तरात आपण म्हटला की शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्याला कळाले की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. मग आपण शिवसेनेत प्रवेश कधी केला?

दिलीप लांडे : फेब्रुवारी किंवा मार्च २०१८नंतर

अ‍ॅड. देवदत्त कामत : जेव्हा आपण प्रवेश केला तेव्हा इतर नेते कोण होते हे आपल्याला माहित होते का

दिलीप लांडे : माझ्या माहिती प्रमाणे ९ नेते होते.सर्वांची नावे तोंडपाठ नाहीत. त्यातील काही नेत्यांची नावे सांगू शकतो.

अ‍ॅड. देवदत्त कामत : आपण ज्या 9 नेत्यांचा उल्लेख केला होता.. कॉलम चारमध्ये ज्या नेत्यांची नावे आहेत ती याच 9 नेत्यांची नावे आहेत का?

दिलीप लांडे : नाही

अ‍ॅड. देवदत्त कामत : त्या 9 नेत्यापैकी आपल्याला कोणत्या नेत्यांची नावे आठवतात

दिलीप लांडे- मला आठवत नाही

अ‍ॅड. देवदत्त कामत : शिवसेना पक्षाचे २०१९ मध्ये जेव्हा आपण निवडणूक लढवली तेव्हा शिवसेनेचे अध्यक्ष कोण होते.

दिलीप लांडे: उद्धव ठाकरे

अ‍ॅड. देवदत्त कामत : हे योग्य आहे का की उद्धव ठाकरे तुमच्या कार्यालयात आले होते. जेव्हा तुमच्या प्रचाराचा २०१९ शेवटचा दिवस होता. तुम्हांला आशीर्वाद व समर्थन देण्यासाठी

दिलीप लांडे : माझ्या काजूपाडा कार्यालयात आले नव्हते. किंवा माझ्या मध्यवर्ती कार्यालयात आले नव्हते

अ‍ॅड. देवदत्त कामत : तुमच्या निवडणूक कार्यालयात आले का?

दिलीप लांडे : माझ्या पहिल्या उत्तरात मी सांगितले आहे.

अ‍ॅड. देवदत्त कामत --शिवसेना विधिमंडळ जो पक्ष आहे त्याची निवडणूक आयोगात नोंदणी केली आहे का

दिलीप लांडे :माहीत नाही

Shiv Sena MLA Disqualification
Maharashtra Politics: 'मंत्रीपद नसलं तरी कोट घाला..' वैभव नाईकांची कोपरखळी, गोगावलेंनी थेट ऑफर दिली; ठाकरे- शिंदे गटात जोरदार जुगलबंदी!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com