shiv sena 16 mla disqualification hearing start today Eknath Shinde Uddhav Thackeray Maharashtra Politics  Saam Tv
महाराष्ट्र

MLA Disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणात मोठी घडामोड.. शिंदे गटाला २ आठवड्याचा वेळ; सुनावणीवेळी काय घडलं?

Shiv Sena MLA Disqualification Case Update: शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला अखेर आज मुहूर्त लागला.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, प्रतिनिधी

Shiv sena MLA Disqualification:

राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला अखेर आज मुहूर्त लागला. विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना शिंदे गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आजपासून दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. (Maharashtra Shivsena Crisis)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना (Shivsena) शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला आजपासून सुरूवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या समोर ही सुनावणी पार पडली. शिवसेना ठाकरे गटाकडून देवदत्त कामत आणि असिम सरोदे यांनी बाजू युक्तीवाद केला.

तर शिंदेगटाकडून अनिल सिंग यांनी बाजू मांडली. यावेळी आम्हाला सुनिल प्रभू यांच्याकडील कागदपत्रे मिळाली नसल्याचे शिंदे गटाने सांगितले. त्यामुळे दोन आठवड्यांची मुदतवाढही देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.

ही मागणी मान्य करत विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आजपासून दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. गणेशोत्सव तोंडावर असल्याने ही मुदत देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, आज सुनावणी झाल्यानंतर आजच निकाल देण्यात यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी केली. तसे पत्रही त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिले. एकूण ३४ याचिकांवर ही सुनावणी होणार आहे. मात्र आजच्या कामकाजात एकाच याचिकेवर सुनावणी पुर्ण झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २ ऑक्टोंबरला होणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT