MLA Disqualification Case Saam Tv
महाराष्ट्र

MLA Disqualification Case: आमदार अपात्र पुढील सुनावणी २० ऑक्टोबरला, आज काय-काय झालं?

MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीवेळी ठाकरे-शिंदेंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला.

Bharat Jadhav

MLA Disqualification Case:

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणी निश्चित दिवसाआधी झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जी-२० देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीला नार्वेकर जाणार आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी आज सुनावणी घेतली. आजच्या सुनावणीत तीन अर्जावर सुनावणी झाली. आज जवळपास ३ तास आज युक्तिवाद झाला. (Latest News)

विधानसभा अध्यक्षांकडून याचिका एकत्र करण्यावर सुनावणी झाली. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानभवनात उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्षांकडून याचिका एकत्र करण्यावर सुनावणी झाली. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानभवनात उपस्थित होते. ठाकरे आणि शिंदेच्या गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ठाकरे गटातील प्रत्येक वकिलाकडून मुद्देसूद मांडणी केलीय. तर याउलट शिंदे गटाकडून युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न केला.

काय म्हणाले शिंदे गटाचे वकील

विधानसभेच्या अध्यक्षांसमोरील सुनावणी झाल्यानंतर शिंदे गटाचे वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे गटाच्या वकिलांनी २० तारखेनंतर निर्णय अपेक्षित असल्याचे म्हंटले आहे. आमचा म्हणणं आहे की, वेगवेगळ्या याचिकामध्ये वेगवेगळे मुद्दे आहे. आमदारांना मुद्दे मांडायचे आहे. प्रत्येकाला मुद्दे मांडायला संधी मिळावी.

आजचे तिन्ही अर्ज त्यांनी केले. त्यामुळे विलंब होत आहे. आधीच्या याचिकांवर सुनावणी झाली तर लवकर प्रकरण मार्गी लागेल. विलंब त्यांच्यामुळे होत आहे, असे शिंदे गटाचे वकील अनिल साखरे म्हणाले. मात्र शिंदे गटाकडून वेळकाढूपणा सुरु असल्याची टीका अनिल देसाई यांनी केली. सर्व याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्यावी, या मागणीवर शिंदे गट ठाम आहे. तर हा शिंदे गटाचा वेळकाढूपणा आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने लावून धरली आहे.

दरम्यान तीन अर्जांवर झालेल्या सुनावणी संदर्भात आता २० तारखेला निकाल दिला जाणार आहे. आमदार अपात्रेसंदर्भात एकत्र सुनावणी व्हावी, काही अधिकची कागदपत्रे द्यायची आहेत. कागदोपत्री पुरावा रेकॉर्डवर घ्यावा आणि अतिरिक्त मुद्दे उपस्थित करायचे आहेत,असे तीन अर्ज करण्यात आले होते. यावर चर्चा होऊन २० तारखेला त्यावर निर्णय देण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील विधान भवनात उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून केवळ त्यांचे वकील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : सांगलीत पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

मसाज पार्लरच्या आड सेxxx रॅकेट; तरूणींना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकललं, नवी मुंबईत ६ युवतींची सुटका

Bigg Boss 19: फिनाले वीकमध्ये गौरव खन्नाला ढसाढसा रडला; 'त्या' प्रश्नामुळे स्पर्धकाच्या डोळ्यात आलं पाणी

बीडमध्ये माजी आमदाराच्या घरावर दगडफेक, गाड्यांच्या काचा फोडल्या, शेकडो पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

SCROLL FOR NEXT