Mumbai News : मुंबईत मराठी माणसाला घरखरेदीत ५० टक्के आरक्षण द्या, CM एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Mumbai Latest News Update : मुंबईत अनेक नव्या इमारतींमध्ये मराठी माणसांना मांसाहारी आहेत म्हणून घर नाकारण्याचे प्रकार घडले आहेत.
Mumbai News
Mumbai News Saam Digital
Published On

संजय गडदे

Mumbai News :

तृप्ती देवरुखकर यांना ऑफिस नाकारल्यानंतर मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईत अनेक सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना घर नाकारण्याच्या आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

तर अनेक बिल्डर देखील काही विशिष्ट समुदायालाच घर विकतात. तिथेही मराठी माणसाला याचा फटका बसतो. याच पार्श्वभूमीवर मुंबईत मराठी माणसाला घर खरेदीत ५० टक्के आरक्षण द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबईत अनेक नव्या इमारतींमध्ये मराठी माणसांना मांसाहारी आहेत म्हणून घर नाकारण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे ऐपत असूनही अनेक मराठी माणसांवर विकासक आणि सोसायटी यांच्याकडून अन्याय झाले आहेत. परिणामी मराठी माणूस मुंबईबाहेर ढकलला जात आहे. (Latest Marathi News)

Mumbai News
Dasara Melava 2023: अखेर ठरलं! शिवतीर्थावर यंदाही ठाकरेंचीच डरकाळी; दसरा मेळाव्यास परवानगी

मराठी माणसाला मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी पार्ले पंचम संस्थेच्या वतीने श्रीधर खानोलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यात मुंबईत मराठी माणसाला घर खरेदीत ५० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे.

नवीन इमारतीत घरांचे बुकिंग सुरू झाल्यानंतर एक वर्षापर्यंत मराठी माणसांसाठी घरांचे ५० टक्के आरक्षण ठेवावे. एक वर्षानंतर या घरांची खरेदी न झाल्यास बिल्डरला ते कोणालाही विकण्याची मुभा असावी. जी मराठी माणसे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील, त्यांना त्यामुळे घर घेणे शक्य होईल,असेही खानोलकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Mumbai News
Nashik Crime News : डॉक्टर महिलेला पती-सासऱ्याने दगडाने ठेचून संपवलं; हत्येचं कारण ऐकून सर्वांना धक्काच बसला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही त्यांनी हे पत्र X अकाउंटवरून पाठवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com