Dasara Melava 2023: अखेर ठरलं! शिवतीर्थावर यंदाही ठाकरेंचीच डरकाळी; दसरा मेळाव्यास परवानगी

Maharashtra Politics on shivaji park: दसरा मेळाव्याला शिवतिर्थावर पुन्हा ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV
Published On

गिरीश कांबळे, प्रतिनिधी

Shivsena Dasara Melava 2023 News:

दसरा मेळाव्याच्या मैदानावरुन सध्या शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. याबाबतची सध्या सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला शिवतिर्थावर पुन्हा ठाकरेंचाच आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दसऱ्याचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच शिवसेनेमध्ये (Shivsena) दसरा मेळाव्यावरुन जोरदार संघर्ष सुरू झाला होता. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे यंदाही दोन दसरा मेळाव्याच्या सभा पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर सभा कोण घेणार? यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू झाली होती.

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) सभा घेण्यासाठी दोन्ही गटाकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. याबाबत आता सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर पुन्हा ठाकरेंचीच डरकाळी पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Uddhav Thackeray
Shirdi Sai Baba : शिर्डीच्या साईचरणी भरभरून दान; भक्तांनी ९ दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींचे दिले दान

मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक...

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या तयारी संदर्भात शिवसेना शिंदे गटानेही तयारी सुरू केली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज नंदनवन बंगल्यावर रात्री 9 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. एमएमआर रिझनमधील पदाधिकाऱ्यांची ही बैठक होणार असून मुंबई ,ठाणे व पालघर परिसरातील आमदार, खासदारही राहणार उपस्थित राहणार आहेत. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
Nashik Crime News : डॉक्टर महिलेला पती-सासऱ्याने दगडाने ठेचून संपवलं; हत्येचं कारण ऐकून सर्वांना धक्काच बसला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com