Shiv Sena MLA Amol Khatal attacked during public event in Sangamner; probe ordered by Radha Krishna Vikhe Patil saam tv
महाराष्ट्र

Amol Khatal:संगमनेरमध्ये राडा! भर कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला|Video

Attack On Shiv Sena MLA Amol Khatal : एका सार्वजनिक कार्यक्रमात शिवसेना आमदार अमोल खताळ त्यांच्यावर काही लोकांनी हल्ला केलाय. हल्ल्याच्या घटनेनंतर खताळ समर्थक आक्रमक झाले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया या घटनेवर दिलीय.

Bharat Jadhav

  • संगमनेरमध्ये शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाला.

  • हल्ला भर कार्यक्रमात घडल्याची माहिती समोर आली.

  • राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडलीय. भर कार्यक्रमात खताळ यांच्यावर झाला झालाय. दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार प्रदर्शनासाठी संगमनेरला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि आमदार खताळ यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली होती. खताळ यांच्यावर हल्ला करणारे कुणाचे कार्यकर्ते आहेत, त्याची चौकशी करा असे आदेश राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत.

शहरातील सार्वजनिक कार्यक्रमात आमदार खताळ आले होते, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. दरम्यान हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्यानंतर खताळ समर्थक आक्रमक झाले आहेत. तर या हल्ल्यानंतर पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील संतापले असून त्यांनी हल्ल्याचा निषेध केलाय. काही लोकांना ठोकशाही मान्य असेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, संतप्त प्रतिक्रिया विखे-पाटील यांनी दिली आहे.

भ्याड करून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल, असा काहींचा गैरसमज असेल तर हा गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही, असा दमही विखे-पाटील यांनी दिलाय. हल्ला करणारे कुणाचे पुरस्कृत? यासंदर्भात पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत. दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत, अशी माहितीही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलीय. काही लोकांनी लोकशाहीचा कौल मान्य केला पाहिजे. त्यांना लोकशाही मान्य नसेल आणि ठोकशाही मान्य असेल तर संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, असेही विखे-पाटील म्हणालेत.

थोरात वैफल्यग्रस्त झालेत- आमदार खताळ यांची टीका

काही दिवसापूर्वी शिवसेना आमदार खताळ यांनी किर्तनकार भंडारे महाराजांना पाठिंबा देताना बाळासाहेब थोरात यांच्यावर खताळ यांनी टीका केली होती. थोरात हे वैफल्यग्रस्त झालेत. जनतेने त्यांच्या हातात खुळखुळा दिलाय, ते खेळत बसा, अशा शब्दात आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्लाबोल केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT