Shivsena mangesh kashikar resigns Saam TV
महाराष्ट्र

शिवसेनेला आणखी एक धक्का; नागपूर सहसंपर्कप्रमुख शिंदे गटाच्या वाटेवर

शिवसेनेला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.

संजय डाफ

नागपूर : शिवसेनेला (Shivsena) लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आमदार, खासदार, नगरसेवकांनंतर आता पदाधिकारीही शिंदे गटात (Eknath Shinde) सामील होत आहेत. नागपुरातही शिवसेनेला आणखी एक जबर धक्का बसला आहे. शिवसेनेचे नागपूर सहसंपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मंगेश काशीकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. (Nagpur Shivsena Latest News)

मंगेश काशीकर यांनी शिंदे गटाचे नेते किरण पांडव यांची भेट घेतल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. या राजीनाम्यानंतर आता ते शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का सांगण्यात येत आहे.

एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांसोबत संवाद साधून लागलेली गळती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे मात्र, शिवसेनेमधून एकनाथ शिंदे गटात सामील होणाऱ्यांची संख्या वाढतच आहेत. (Nagpur Todays News)

नागपुरातील खासदार तुमाने, आमदार जैस्वाल, जिल्हाप्रमुख ईटकीलवार यांच्यानंतर मंगेश काशीकर आता शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे विदर्भात शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या गळतीचा फटका शिवसेनेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि इतर निवडणुकीत बसू शकतो.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT