Sharad Pawar Saam
महाराष्ट्र

Sharad Pawar: राज ठाकरे -उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Raj and Uddhav Thackeray Alliance Talks Sharad Pawar Keeps Silence: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Bhagyashree Kamble

भरत नागणे, साम टीव्ही

शनिवारी राजकीय वर्तुळ जणू 'ठाकरे'मय झालं होतं. अलिकडच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंनी युतीसाठी उद्धव ठाकरेंना घातलेली साद आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे लवकरच युती होणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात रंगला आहे. या मुद्द्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी ही युती होणं अशक्य आहे, असं ठाम विधान केलं आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. या विषयावर मौन बाळगल्याने विविध तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

शरद पवार आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष रवी पाटील यांच्या लेकीच्या लग्नासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांचे आगमन हेलिपॅडवर झाले. त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या दौऱ्यात त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांना राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला होता. शरद पवारांनी या प्रश्नाला सोप्या शब्दात उत्तर देणं टाळलं. ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलणं टाळल्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.

ठाकरे गटाची ताकद आणखी वाढेल

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास सकारात्मक परिणाम होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. या युतीमुळे शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणखी नक्कीच वाढले, असंही भुजबळ म्हणाले आहेत.

भुजबळ उदाहरण देत म्हणाले की, "दोन कार्यकर्ते जरी आम्हाला मिळाले, तरी आम्हाला वाटतं की आपली शक्ती वाढली. इथे तर दोघंही लीडर आहेत. एखादा पडलेला आमदार सुद्धा आमच्याकडे आला तर आम्ही आनंद मानतो. भविष्यात ही युती झालीच तर त्याचा प्रभाव नक्कीच जाणवेल", असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात उंड्री,जगदंब भवन मार्ग, मार्वल आयडियल सोसायटीच्या बाराव्या मजल्यावर आग

Sameer Wankhede: समीर वानखेडेंना दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका; आर्यन खानच्या सिरिज विरुद्ध याचिकेत कोर्टानं फटकारलं, सांगितलं...

Mumbai Shocking : तरुणी ३ महिन्यांपासून बेपत्ता; पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड, कुटुंबीयांची पायाखालची जमीनच सरकली

Mumbai To Aklola Travel: मुंबई ते अकोला प्रवास कसा करायचा? बस, ट्रेन, कार आणि फ्लाइट पर्याय

Crime: वहिनीसोबत अनैतिक संबंध, तरुणाकडून सख्ख्या भावाची हत्या; डोक्यात दगड घालत घेतला जीव

SCROLL FOR NEXT