Shiv Jayanti Saam Tv
महाराष्ट्र

Shiveri: शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह, आकर्षक रोषणाई अन् फुलांची सजावट; लाखो शिवभक्तांची गर्दी; पाहा VIDEO

Shiv Jayanti Celebration At Shivneri: आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर लाखो लोकांनी गर्दी केली आहे.

Siddhi Hande

रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. स्वराज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण किल्ल्याला फुलांनी सजवण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचा पाळणादेखील खूप सुंदर सजवला आहे. किल्ल्यावर सर्वत्र शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा होत आहे.

शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहे. यानिमित्ताने किल्ल्याच्या पायथ्याशी फटाक्यांची आतिषभाजी करत जल्लोष करण्यात आला. काल रात्रीपासूनच अनेक शिवभक्त मशाली घेऊन शिवनेरीवर दाखल झाले आहे. किल्ले शिवनेरीवरच्या या शिवजन्मोत्सव कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होणार असुन राज्याचे कारभारी गडावर येत असुन शेतकरी आणि जुन्नर करांच्या समस्या समजून घ्याव्यात जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषीत झाला मात्र पर्यटनासाठी अर्थसंकल्पात तरतुद होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. पर्यटनाला चालणा देण्यासाठी किल्ले शिवनेरीववरुन घोषणा करावी आणि शिवनेरीवर सर्वात उंच ध्वज उभा रहावा अशीही मागणी जुन्नरकरांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुर्णाकृती पुतळा हा जुन्नर तालुक्यात उभा राहणार आहे. या पुतळ्याचे पाद्य शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले आहे. शिवनेरी किल्ल्यावर लाखोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित आहेत. महिला, लहान मुले, तरुण आणि वयोवृद्ध लोक शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महारांजाना मानवंदना करण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. त्यांचा खूपच उत्साह आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Aamir Khan : बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी एकाचवेळी २५ आयपीएस अधिकारी धडकले, नेमकं प्रकरण काय?

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT