Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News: सावकारी जाचाला कंटाळला; स्‍टेटस्‌ ठेवत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

सावकारी जाचाला कंटाळला; स्‍टेटस्‌ ठेवत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : सावकारांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून २० वर्षीय तरुणाने तापी नदीत (Tapi River) उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी घडली. दुर्गेश दीपक धनगर असे मृत तरुणाचे नाव असून (Shirpur) तो शहरातील क्रांतीनगरमधील रहिवासी आहे. (Latest Marathi News)

दुर्गेशने दुपारी अडीचला त्याच्या मोबाईलमध्ये व्हॉटसअ‍ॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाऊंटवर आत्महत्या करीत असल्याबाबत स्टेटस ठेवले होते. त्यात माझ्या आईवर आणि भावावर कर्ज झाले आहे, कर्ज देणारे खूप त्रास देत आहेत. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे; अशा आशयाचा मजकूर होता. तो पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांमध्ये खळबळ उडाली. त्याचा शोध घेण्यासाठी मित्र रवाना झाले. मात्र दुपारी तीनला सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकताना त्याला काहींनी पाहिले. त्यानंतर लगेचच त्याचा शोध सुरु झाला. सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह हाती लागला.

त्रासाने भावानेही गाव सोडले

दुर्गेश धनगर याच्या वडिलांचे निधन झाले असून त्याच्या मागे आई, मोठा भाऊ व बहीण आहे. त्याच्या मोठ्या भावाने काही जणांकडून कर्ज घेतले होते. प्रचंड व्याजदर लावल्यामुळे कर्जाची रक्कम वाढत गेली. संशयित सावकार भावाला मारहाण करून वसुली करू लागले. त्यामुळे भावाने काही दिवसांपूर्वी शिरपूर सोडले. नंतर सावकारांनी आपला मोर्चा दुर्गेशकडे वळवला. त्यालाही धमकावणे सुरु झाले. त्यांच्या त्रासाला वैतागून त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT