Shirdi Sai Sansthan worker double killed  SaamTV
महाराष्ट्र

Shirdi Murder News: शिर्डी दुहेरी हत्याकांड; थरारक हत्येचं दुसरं CCTV फुटेज समोर, अंगावर काटा आणणारा Video पाहा

Shirdi Double Murder News: आज सोमवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यात साई संस्थानच्या २ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. या दुहेरी हत्याकांडाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहिल्यानगर (शिर्डी) : महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण ताजं असतानाच आता साईबाबांच्या शिर्डीत दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. साई संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोन सेवकांची भल्या पहाटे हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं शिर्डीत खळबळ उडाली आहे. या घटनेतील पहिला व्हिडीओ समोर आल्यानंतर आता हत्येचा दुसरा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

घटनेचा नेमका थरार काय?

शिर्डीतील साई संस्थानचे तीन सेवक पहाटे सुमारास ड्युटीवर निघाले होते. कामावर जात असताना तिघांवर अज्ञाताने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. मात्र, हा हल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आला आहे. पण या तिन्ही घटनांमुळे शिर्डीत भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले बघायला मिळत आहेत. हा हल्ला का झाला? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

आज सोमवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यात साई संस्थानच्या २ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. या दुहेरी हत्याकांडाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय. तर हल्ला झालेला तिसरा इसम हा खासगी कर्मचारी होता. तो देखील कामावर जात होता. या हल्ल्यात तो देखील गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर लोणीच्या प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीचं लोण पसरलेलं बघायला मिळत आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज बघायला मिळाली आहे. साई संस्थानचे दोन कर्मचारी पहाटे कामावर जात असताना त्यांच्यावर वेगवेगळ्या भागांमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले आहेत. आता या घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक हरल्याचा राग, ठाकरेंच्या नेत्याचा देवेंद्र शिंदेंवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update: गडचिरोलीत घनकचरा व्यवस्थापन केंद्रला लागली भीषण आग

प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रायव्हेट ऑडिओ क्लिप व्हायरल; सोशल मीडियावर पोस्ट करत दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

पाटील पिता-पुत्र खून खटल्यात कोर्टाचा निकाल, माजी नगराध्यक्ष पवारसह 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

LPG Gas Cylinder Crisis: शहरात आणि ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळेल गॅस सिलिंडर? सरकारनं दिली नवी अपडेट

SCROLL FOR NEXT