Shirdi Sai Mandir Saam Tv
महाराष्ट्र

Shirdi Sai Mandir : नवीन वर्षाचे स्वागत करा शिर्डीत तेही फक्त २० रुपायात; नेमकं कस जाणून घ्या...

साईभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी संस्थान कडून चोख व्यवस्था

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे

शिर्डी - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळांवर सुद्धा गर्दी होताना दिसत आहे. त्याच अनुषंगाने देशभरातून येणाऱ्या साई भक्तांच्या सेवेसाठी साईबाबा संस्थान सुद्धा सज्ज झालं आहे. शिर्डीतील (Shirdi) हॉटेल्स, लॉजिंग यासह साई संस्थानचे भक्तनिवास देखील हाऊसफुल असल्याचे चित्र आहे.

३१ डिसेंबर रोजी होणारी गर्दी लक्षात घेता साई भक्तांना राहण्याची तात्पुरती व्यवस्था साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. भक्त निवास शेजारी असणाऱ्या मोठ्या मांडवात एक हजार भक्त एकाच वेळी राहू शकतील अशी व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. याठिकाणी अवघ्या पाच रुपयात गादी तर ५ रुपयात चादर मिळणार आहे. (Latest Maharashtra News)

त्याच बरोबर अत्यल्प दरात चहा, नाष्टा तसेच मोफत भोजनाची व्यवस्था देखील साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे अगदी २० रुपयांत साईभक्त शिर्डीत नवीन वर्षांची सुरुवात साई दर्शनाने करू शकणार आहे. साई संस्थानने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे साईभक्तांनी देखील समाधान व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

SCROLL FOR NEXT