Ajit Pawar : अजित पवारांना मुंबई जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून स्पेशल सोय; नेमकं कारण काय?

हिवाळी अधिवेशनासाठी अजित पवार सध्या नागपुरात आहेत.
Ajit Pawar News
Ajit Pawar News Saam Tv
Published On

Ajit Pawar News : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. अनिल देशमुख यांच्या जामिनाला दिलेली स्थगिती वाढवण्याची सीबीआयची विनंती आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज सुटका होणार आहे. त्यांची भेट घेण्यासाठी अजित पवार मुंबईत येणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता खुद्द अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिल आहे.

Ajit Pawar News
Crime News : लहान दीराकडून वहिनीचं अपहरण; मित्रासोबत मिळून केला अत्याचार, काळीमा फासणारी घटना

मुख्यमंत्री शिंदे यांनीच सरकारी विमानाने मुंबईला जाण्यास सूचवलं आणि त्यासाठी त्यांनी विमान उपलब्ध करुन दिला आहे. हिवाळी अधिवेशनासाठी अजित पवार सध्या नागपुरात आहेत. परंतु राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांची आज मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून सुटका होणार आहे. त्यांची भेट घेण्यासाठी अजित पवार मुंबईत येणार आहेत.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुख यांची आज सुटका होणार आहे. मात्र त्यांना मुंबई बाहेर जाता येणार नाही. प्रत्येक नागरिकांनी नियमाचं आदेशाचं पालन कारण जरजेच असत आणि त्या पद्धतीनेच अनिल देशमुख हे देखील सर्व नियमांचं पालन करणारच. काल रात्री त्यांच्या वकिलाला अधिवेशनातील सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची भेट घेण्यासाठी अजितदादांसोबत दिलीप वळसेपाटील मुंबईला जाणार आहेत. अजितदादांनी पत्रकारांशी संवाद साधताना तशी माहिती दिली आहे.

Ajit Pawar News
Samruddhi Mahamarg : अपघात रोखण्यासाठी प्रशासन सरसावले, खबरदारी म्हणून 'ही' पावलं उचलणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जयंत पाटील आणि माझा मुंबईला जाण्याचा प्रयत्न आहे. हे सगळं होत असताना काल मला उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक असल्याची माहित एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाली. ही बैठक २८ डिसेंबर रोजी घेण्याऐवजी २९ डिसेंबर रोजी घ्यावी, अशी मी त्यांना म्हणालो. मला आज मुंबईकडे निघायचे असल्यामुळे मी तशी विनंती केली होती. कारण मी आज अकरा वाजताच निघणार होतो. तर त्यांनी सांगितलं की दहा वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक लावतो. तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करुन देतो. त्यातून तुम्ही जा आणि काय काम आहे ते करुन परत या. त्यामुळे मी माझा कार्यक्रम बदलला. दिलीप वळसे पाटील आणि मी दुपारी एक वाजता शासनाच्या विमानाने मुंबईला जाणार आहोत असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com