Online Fraud : सावधान ! QR कोडने पैसे देताय ? तर या चुका करु नका अन्यथा, बँक खाते रिकामे होईल

छोट्या छोट्या दुकानदाराकडे देखील ऑनलाइन पेमेंट स्विकारण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत.
Online Fraud
Online FraudSaam Tv
Published On

Online Fraud : हल्लीच्या डिजिटलायझेशनच्या युगात सगळ्यांना ऑनलाइन पेमेंट करणे सोपे वाटते. छोट्या छोट्या दुकानदाराकडे देखील ऑनलाइन पेमेंट स्विकारण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. त्यातच एक बातमी समोर आली आहे ज्यामध्ये QR कोडने पेमेंट केल्यामुळए 88 लाखाची फसवणूक करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण यूपीमधील प्रतापगडमधील आहे.

सदर व्यक्ती आरशाच्या दुकानातून काही सामान घेण्यासाठी गेला आणि पेमेंट करताना त्याला 55 हजार रुपये भरण्यास सांगितले. घोटाळेबाजांनी पेमेंटसाठी दुकानदाराला QR कोड मागितला आणि यानंतर दुकानदाराच्या बँक खात्यातून 88 लाख रुपयांची मोठी रक्कम चोरीला गेली. अशी अनेक प्रकारच्या फसवणूकीच्या केसेस समोर येत असतात.

Online Fraud
Online Fraud Protection Tips : ऑनलाइन शॉपिंगचा होतोय गंडा; अशी घ्या काळजी, अन्यथा खात होईल रिकाम !

तुम्ही QR कोडने पैसे भरल्यास, तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा तुमचे खाते रिकामे होऊ शकते. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या

Online payment
Online payment Canva

या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

  • QR कोड स्कॅन केल्यानंतर, साइट आणि डोमेन नाव तपासण्याची खात्री करा.

  • तुम्हाला QR कोड स्कॅन करून पैसे भरण्यासाठी कोणतेही अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही.

  • आम्ही तुम्हाला सांगतो की बहुतेक स्मार्टफोन्समध्ये (Smartphone) कॅमेरा अॅपमध्ये स्कॅनर असतो. जर कोणी क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी अॅप डाउनलोड करण्यास सांगत असेल तर ते टाळले पाहिजे.

  • तुम्ही तुमचा UPI आयडी किंवा बँक (Bank) खाते माहिती QR कोडसह पेमेंटसाठी शेअर करू नये.

  • वापरकर्त्यांनी QR कोडद्वारे पेमेंट करण्यासाठी OTP वापरू नये.

  • अशा प्रकारे पेमेंट स्वीकारू नका पेमेंट QR कोड वापरून स्वीकारले जाऊ नये. कारण हॅकर्सद्वारे QR कोड आधारित पेमेंट स्वीकाराच्या नावाने दुर्भावनापूर्ण कोड पाठविला जातो, जो तुमच्या स्मार्टफोनवर नियंत्रण ठेवतो आणि नंतर बँकिंग फसवणूक केली जाते.

टीप - ऑनलाइन पेमेंटसाठी नेहमी प्रमाणीकृत पेमेंट प्लॅटफॉर्म वापरा Gpay, PhonePe आणि Paytm चा QR कोड स्वीकारला जावा. अन्यथा तुमचे बँक खाते हॅक होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com