Heavy Rain Updates Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Rain: रात्रभर ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमाण; शेतीसह रस्ते पाण्यात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

राज्यभरात परतीच्या पावसाने (Heavy Rain) धुमाकुळ घातला आहे. ऐन पिक काढणीच्या वेळेत आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे -

शिर्डी: राज्यभरात परतीच्या पावसाने (Heavy Rain) धुमाकुळ घातला आहे. ऐन पिक काढणीच्या वेळेत आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) प्रचंड नुकसान झालं आहे. तर पुण्यासारख्या शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना देखील नद्यांच स्वरुप आलं आहे.

पुण्यासह (Pune) पश्चिम महाष्ट्रामध्ये पावसाने थैमाण घातलं असतानाच आता उत्तर नगर जिल्ह्यात देखील पुन्हा ढगफुटी सदृष्य पाऊस पडला असून या पावसामुळे शिर्डीतील रस्ते पुन्हा जलमय झाले आहेत. या पावसाचा अनेक गावांना फटका बसला आहे.

पाहा व्हिडीओ -

तर राहाता, कोपरगाव, संगमनेर (Sangamner) तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु असल्याने शेतीसह रस्ते पाण्यात गेले आहेत तर अनेक नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं आहे. त्यामुळे या पावसाने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत केलं आहे.

शिर्डीसह शिरूर तालुक्यातील रांजणगाव (Ranjangaon) परिसरात देखील ढगफुटी सदृश्य पावसाने हैदोस घातला आहे. मागच्या तीन दिवसांपासुन सातत्याने ढगफुटी सदृश्य पावसाने ज्वारीचे पिकं पाण्यात गेलं आहे. तर शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे.

उन्हाळी जनावरांना चारा आणि कुटुंबाला वर्षभरासाठी धान्य मिळावं यासाठी ज्वारीची दुहेरी भुमिका असते या यंदा पाऊसाच्या अतिवृष्टीने उभी पिकं पाण्यात गेलीय त्यामुळे पुढील काळात जनावरांच्या चारासह धान्याचीही चणचण भासणार असून शासनाने यासाठी भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने, गाव खेड्यातील अनेक नद्यांना पूरस्थिती आली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. माजलगावच्या उमरी गावपरिसरातील सरस्वती नदीला पूर आल्याने, उमरी गावचा संपर्क तुटला असून गावातही नदीपात्राचे पाणी शिरल्यामुळे माजलगावसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT